धाराशिव / प्रतिनिधी-

डॉ.पदमसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन रविवार दि.३०एप्रिल २०२३ रोजी हावरगाव, ता.कळंब येथे सकाळी १०:०० ते ४:०० या वेळेत करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात हावरगाव व परिसरातील सर्व वयोगटातील ५०० महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.

 कार्यक्रमाचे उघाटन जेष्ठ विश्वस्त विजेद्र आण्णा चव्हाण व अशोक भाऊ शिंदे यांच्या हस्ते झाले  या वेळी सरपंच हारीभाऊ राऊत, उपसरपंच नामदेव आबा कोकाटे, राजेद्र कोल्हे, चेअरमन सुधाकर कोल्हे, मार्केट कमीटी सदस्य लक्ष्मण कोल्हे, आनंत कोल्हे, ग्रा. प. सदस्य अनिल हजारे, कंचनाबाई कोल्हे, राणी वावरे, जयंती अध्यक्ष प्रशांत हजारे, विठ्ठल हजारे, रितेश कोल्हे, छत्रगुन कोल्हे, सतिश कोल्हे, इत्यादी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.‍ अजित निळे, डॉ.दानिश पटेल, डॉ.वेदांत शहा, डॉ. नियती संगवे, डॉ. खुशबू रुंगता, डॉ. विपूल जैस्वाल यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे नामदेव शेळके, आमिन सय्यद, विनोद ओव्हाळ, पवन वाघमारे,  निशिकांत लोकरे, सचिन व्हटकर व इटकुर आरोग्य केंद्राचे डॉ. रजनिश गाडे व आशा कार्यकर्त्या हाजारे, कोल्हे, कदंम, पाचांळ, यांनी परीश्रम घेतले.

 
Top