उमरगा/ प्रतिनिधी-

  तथागत गौतम बुद्ध जयंती निमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर तथागत भगवान बुद्धाच्या प्रतिमेचे पूजन संगीता सोनकांबळे,लता ताई कोल्हे यांनी केले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 यावेळी बौद्धाचार्य मिलिंद डोईबळे यांनी त्रिशरण पंचशील,बुद्ध पुजा,भीम स्तुती घेण्यात आली यावेळी जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती हरीश डावरे,अडँ. हिराजी पांढरे,बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष संतोष सुरवसे, सचिव अविनाश भालेराव, किरण कांबळे, मनोहर सुरवंशी , तानाजी सुरवसे, सतीश टोपगे,गुणरत्न भालेराव, जयवंतराव पाटील, सुनील वाघमारे, निर्मला सुरवसे, फुलचंद कांबळे,शाक्यदिप कांबळे,मल्हारी सुरवसे, उमाजी गायकवाड,प्रा.नागनाथ गायकवाड, बलराज हिप्परगे आदी उपस्थित होते.


 
Top