धाराशिव / प्रतिनिधी-

 भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे दि. ११ मे रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असुन जिल्हाध्यक्ष श्री. नितीन काळे यांच्या अध्यक्षतेखाली आज पूर्व नियोजन बैठक संपन्न झाली. नुकत्याच पार पडलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आ. राणाजगजितसिंह पाटील व माजी आ. सुजितसिंह ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी केलेल्या कामामुळे भारतीय जनता पार्टीला मोठे यश लाभले असून धाराशिव जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्षांच्या  भव्यदिव स्वागताला सज्ज असल्याचा विश्वास भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केला. 

 भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळे हे दिनांक 11 मे रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर  येत आहेत. त्यांच्या दौऱ्यात जिल्ह्यात होणाऱ्या कार्यक्रमाच्या पुर्वतयारीसाठीची बैठक आज जिल्हाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कार्यालयात पार पडली.या दौऱ्यात मा.प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीत शाखा उद्घाटन, बाईक रैली, सामाजिक मेळावा, सरपंच लोकप्रतिनिधी मेळावा,सोशल मिडिया बैठक याबाबत पुर्वनियोजन करण्यात आले. बुथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, युवा वॉरीयर्स, सर्व आघाडी व कार्यकारिणी यांच्यासोबत ते बैठका घेणार आहेत. 

 बैठकीच्या सुरूवातीला बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले, तसेच जिल्ह्यातील प्रदेश कार्यकारिणी मध्ये समावेश झालेल्या सौ. अस्श्रीमिता कांबळे, अनिल काळे, श्री. मकरंद पाटील या पदाधिकाऱ्यांचा व बाजार समिती निवडनुकीत विजयी पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

 यावेळी माजी जिलाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नेताजी पाटील, युवा मोर्चा जिलाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, तालुकाध्यक्ष संतोष बोबडे राजकुमार पाटिल, राजाभाऊ पाटिल, अजीत पिंगळे. महादेव वाडेकर, राजेंद्र पाटील यांच्यासह बाजार समितीचे नवनियुक्त संचालक तसेच पक्ष संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन श्री. पांडुरंग पवार यानी केले. 
Top