धाराशिव / प्रतिनिधी-

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दोन मे रोजी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला होता त्यानंतर धाराशिव जिल्हाध्यक्षांसह 32 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिला या महानाट्यानंतर आज अखेर शरद पवार यांनी आपला निर्णय रद्द करत पुन्हा अध्यक्षपदावर राहण्याचे जाहीर केले त्यामुळे धाराशिव राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार घोषणाबाजी व फटाक्याची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला त्याप्रसंगी पक्षाचे नेते संजय मामा निंबाळकर, जिल्हा कार्याध्यक्ष संजय दादा दुधगावकर, मसूद  शेख, अमित  शिंदे, महेंद्र  धुरगुडे, खलिफा भाई कुरेशी, आयाज   शेख,कादर खान, असद पठाण , वाजीद भाई पठाण,सतीश घोडराव,एजाज शेख, गयास मुल्ला, इस्माईल शेख, मनोज मुदगल, राजकुमार पवार, रणवीर इंगळे, शेखर घोडके, बिलाल तांबोळी, मृत्युंजय बनसोडे, जयंत देशमुख आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top