तेर/ प्रतिनिधी-
धाराशिव तालुक्यातील पानवाडी येथील ओमराजे सोमनाथ डोंगरे याने केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (सीबीएसई) नवी दिल्ली यांच्या वतीने घेण्यात आलेल्या 10 वी परीक्षेत 95.60 टक्के गुण घेऊन यश मिळवले आहे. तो लातूर येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी आहे.
ओमराजे डोंगरे याचे सातवी पर्यंतचे शिक्षण पाथरी जि. परभणी येथील माळीवाडा जिल्हा परिषद शाळेत झाले. आठवी ते दहावीचे शिक्षण लातूर येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये झाले. आठवी व नववी कोरोना महामारीमुळे शाळा झाली नाही. त्या काळात त्याला ऑनलाईन शिक्षण मिळाले. फक्त दहावी नियमित शाळा झाली. पहिली ते सातवी पर्यंत मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलेल्या ओमराजे डोंगरे याने इंग्रजी माध्यमाच्या दहावी सीबीएसई बोर्ड परीक्षेत 95.60 टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे.
या यशाबद्दल पानवाडी गावचे पोलीस पाटील सुभाष कदम-पाटील, माजी उपसरपंच आगतराव डोंगरे, शिक्षक काकासाहेब डोंगरे, सीताराम कदम, नानासाहेब सावतर, प्रेमनाथ डोंगरे, जयचंद कदम, सूर्यकांत ढगे, शिवनेरी दूध डेअरीचे चेअरमन सुरेश कदम, शरद माने, मनोज माने आदींनी ओमराजे याचे अभिनंदन केले आहे.