धाराशिव / प्रतिनिधी-

धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कामकाजासाठी तयार होत असलेल्या CMS सॉफ्टवेअर प्रणालीचे आज जिल्हा परिषदेच्या समन्वय समितीमध्ये सर्व विभाग प्रमुख, गटविकास अधिकारी, तालुकास्तरावरील अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले.

 जिल्हा परिषदेकडून कार्यान्वित होत असलेल्या, Central Management System (CMS Software) च्या मदतीने यापुढे एकाच ठिकाणी इंटरनेटद्वारे ऑनलाईन पद्वतीने सर्व विभागांच्या योजनांची तसेच आस्थापना विषयक बाबींची अद्यावत माहिती उपलब्ध होणार आहे. या सॉफ्टवेअर प्रणालीमध्ये सर्व विभागांच्या योजनांची व आस्थापना विषयक बाबींची माहिती त्या विभागाचे युजर आयडी द्वारे online पद्वतीने अपलोड करता येणार असून त्या माहितीचे एकत्रीकरण इंटरनेटद्वारे वेबसाईटला होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद मुख्यालय तसेच क्षेत्रिय स्तरावरील कार्यालये यांमध्ये समन्वय व आढाव्यासाठी जिल्हा परिषदे अंतर्गत शासकीय कार्यालयीन माहितीची देवाण-घेवाण तात्काळ उपलब्ध होणार असल्यामुळे प्रशासकीय कामकाजाची गती वाढणार आहे. त्यामुळे विविध विकास योजनांच्या कामांची सध्य:स्थिती नियमितपणे या सॉफ्टवेअरला अद्यावत करावयाची आहे. त्यामुळे योजनांच्या अंमलबजावणीसाठी वरिष्ठांच्या सूचना व आवश्यक मार्गदर्शन तात्काळ होणार असल्यामुळे याद्वारे जिल्हा परिषदेच्या उल्लेखनीय कामकाजास प्रोत्साहन व गती मिळणार आहे.

  जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांची माहिती, तसेच तालुका स्तरावरून पंचायत समिती स्तरावरील क्षेत्रिय अधिकाऱ्यांकडून कामांच्या सध्य:स्थितीबाबतची अद्यावत माहिती या प्रणालीद्वारे एकत्रित करणे सोईचे होणार आहे. सध्य:स्थितीत सर्व विभाग शासनाच्या वेगवेगळ्या पोर्टलवर त्या-त्या विभागाची माहीत भरत आहेत. शासनाच्या विविध विभागांच्या पोर्टलवर नियमितपणे भरली जाणारी ही माहिती या CMS प्रणाली मध्ये अपलोड करण्याची सुविधा दिल्यामुळे ती सर्व माहिती जिल्हा परिषदेसाठी सुद्वा इंटरनेटद्वारे एकाच ठिकाणी संकलित केली जाणार असल्यामुळे त्याविषयी चर्चा करणे, आढावा घेणे तसेच ज्या योजनेच्या प्रगतीमध्ये अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. अशा बाबींवर लक्ष पुरविता येईल. यामध्ये विविध योजनेच्या कामांची क्षेत्रिय स्तरावरील सध्य:स्थिती तसेच संचिकांची सध्य:स्थिती या बाबींवर लक्ष पुरविता येणार आहे.

 तालुकास्तरावर विविध विकास योजनांच्या अंमलबजावणीसाठी निधी वितरित केला जातो परंतु सदरचा निधी विहित वेळेत खर्च होण्याकरिता योजनेच्या कामांच्या सध्य:स्थितीचा आढावा वरिष्ठस्तरावरुन नियमितपणे घ्यावा लागतो. यासाठी वरिष्ठस्तरावरील प्रशासकीय अधिकारी यांचा यासाठी पुर्वीप्रमाणे बराचसा वेळ आढाव्यासाठी जातो. तथापि, या सॉफ्टवेअरद्वारे विकास कामांची सध्य:स्थिती व योजनेसाठी झालेला शासकीय निधीचा खर्च यांची माहिती नियमितपणे अपलोड करावयाची आहे. त्यामुळे ह्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विकास योजनांच्या यशस्वी अंमलबजावणी करिता गती निर्माण होण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. केंद्र, राज्य, जिल्हा आणि जिल्हा परिषद सेस यांच्याकडून विकास योजनांसाठी प्राप्त होणाऱ्या निधीच्या खर्चाचा एकत्रित अहवाल या सॉफ्टवेअरच्या मदतीने उपलब्ध होणे अधिक सोईचे होणार आहे. तसेच या सॉफ्टवेअरच्या मदतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना योजनांच्या कामांची सध्य:स्थिती जाणून घेण्यासाठी क्षेत्रिय स्तरावरील माहिती नियमितपणे उपलब्ध होणार असल्यामुळे आढाव्यासाठी वारंवार माहिती मागविण्याची आवश्यकता भासणार नाही. जी माहिती आवश्यक माहिती आहे ती त्वरित उपलब्ध होण्यासाठी हे सॉफ्टवेअर विकसित करण्यात येत आहे.

धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्तायांच्या संकल्पनेतून तयार होत असलेल्या या CMS सॉफ्टवेअर प्रणालीचा जिल्हा परिषदेतील प्रशासकीय कामकाजाची गती व झिरो पेन्डन्सी साठी सर्व स्तरावर नक्कीच फायदा होणार आहे.

 
Top