धाराशिव / प्रतिनिधी-

काटी ता.तुळजापूर येथे आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते रु. ३ कोटी ८७ लाख रुपयांच्या निधीतून विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले. 

 तसेच  यावेळी काटी ते जवळगाव रस्ता डांबरीकरण करणे (रु. ७५ लक्ष ), राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत पाणी पुरवठा योजना (रु. ७५ लक्ष ), जामा मंदिर ते भैरवनाथ मंदिर सिमेंट रस्ता (१० लक्ष रु.), श्री.अमर देशमुख यांचे घर ते खंडोबा मंदिर पर्यंत सिमेंट रस्ता (रु.६ लक्ष),  जामा मजीद ते भैरवनाथ मंदिर सिमेंट रस्ता (रु.१० लक्ष)  या कामांचे लोकार्पण करण्यात आले. तर जिल्हा परिषद शाळेसमोरील सिमेंट रस्ता (रु.१० लक्ष), काटी ते खुंटेवाडी रस्ता डांबरीकरण (रु.३० लक्ष), काटी बस स्टॅन्ड सिमेंट रस्ता (रु.१५ लक्ष), श्री.जयसिंग सावंत यांच्या घरापासून ते श्री.दत्ता सुळे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता (रु.१० लक्ष), श्री.रहीम बेग ते मदिना मस्जिद सिमेंट रस्ता (रु.२०लक्ष), आरोग्य उपकेंद्र बांधकाम (रू. ८७ लक्ष), जनावरांचा दवाखाना (रू.३० लक्ष), आरोग्य उपकेंद्र वॉल कंपाऊंड (रू.१४ लक्ष) या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.   येथील ऐतिहासिक जामा मस्जिद दुरुस्तीसाठी पुरातत्व विभागाकडे विशेष पाठपुरावा करण्यासह इतर मागण्यांच्या अनुषंगाने निधी उपलब्ध करून देण्याचे मान्य केले. 

 यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, जिल्हा संयोजक नेताजी पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, प्र.कार्यकारिणी सदस्य ऍड.अनिल काळे, तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, जिल्हा उपाध्यक्ष अँड.दीपक आलुरे, मा. जि. प. सदस्य राजकुमार पाटील, यशवंत अण्णा लोंढे, सज्जनराव साळुंखे,  पिटू भैया गंगणे, सचिन पाटील,  विजय गंगणे सर, राजसिंह  राजेनिंबाळकर, आनंद कंदले, राजाभाऊ पाटील, राजाभाऊ सोनटक्के, बाबा श्रीनामे,  महादेव जाधव, यांच्यासह आदेश कोळी, अनिल गुंड, करीम बेग, मकरंद देशमुख, संजय साळुंखे, धनाजी ढगे, जुबेर शेख, अरविंद ढगे, बाळासाहेब भाले, संपत पंखे, मंजूर कुरेशी, गोकुळ सोनवणे, बाळासाहेब शिंदे, संजय महापुरे, अनिल बनसोडे, अविनाश वाडकर, अविनाश देशमुख आदी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यांच्यासह बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.


 
Top