तेर  / प्रतिनिधी-

धाराशिव तालुक्यातील हिंगळजवाडी येथील हिंगळजदेवी यांचा वार्षिक यात्रा महोत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला.

सहा एप्रिलपासून ते तेरा एप्रिल पर्यंत दररोज पहाटे महापूजा करण्यात आली.बारा एप्रिलला रात्री बारा वाजता देवीची पालखी मिरवणूक व छबीनाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने भाविकभक्त सहभागी झाले होते.तेरा एप्रिलला जंगी कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या.कुस्ती स्पर्धेत तेर येथील सोमनाथ माने प्रथम विजेते ठरले.


 
Top