कळंब / प्रतिनिधी- 

कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अटीतटीचे निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून महाविकास आघाडी 18 पैकी 11 बहुमताने विजय मिळवला असुन भाजप शिंदे गटाला सात जागेवर समाधान  मानावे लागले 

यावर्षी ची कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक चांगलीच चर्चेचा विषय बनत होती. प्रचाराचा नारळ फोडल्यापासून कमालीची एक एक मतदार आपल्याकडे कसा वळवता येईल याची झुंज पहावयास मिळाली होती. खासदार आमदार व नगर परिषद निवडणुकीत ऐवडे महत्व नसल्याचे या कळंब बाजार समितीच्या निवडणुकीत चित्र पाहावयास मिळाले जणु काही वरुनराजा वरुन पाऊस आवकाळी स्वरुपात पाडत आहे तस तसं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत एक मतदारांसाठी उमेदवार आर्थिक पाऊस बरसत होते.

शेवटी या रंगतदार निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून महाविकास आघाडीच पारड जड राहीले व 18 पैकी 11 जागेवर  महाविकास आघाडीने विजय मिळवून बहुमत प्राप्त केलं. 

महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार

सोसायटी मतदार संघ

१)श्री. शिवाजी दिगंबर कापसे,

२)श्री.श्रीधर गंगाधर भवर,

३)श्री.हनुमंत रामकृष्ण आव्हाड,

४)श्री.संदीप गौतम मडके,

५)श्री.कल्याण संदीपान टेकाळे,

व्यापारी मतदार संघ*

१)श्री.लक्ष्मण ज्ञानोबा कोल्हे,

२)श्री.रोशन राजेश पारख,

*सोसायटी महिला मतदार संघ*

१)सौ.सुजाता तुषार वाघमारे,

२)सौ.सुनीता प्रभाकर शेळके,

*सोसायटी ओबीसी मतदार संघ*

१)श्री.भारत सदाशिव सांगळे,

२)श्री.हरिचंद गुणवंत कुंभार

 
Top