धाराशिव / प्रतिनिधी-

समलिंगी विवाह कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी उस्मानाबाद येथे धारासुर मर्दिनी महिला फेडरेशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

समलिंगी विवाह हा भारतीय संस्कृतीच्या विरुद्ध असून हा विषय अनैसर्गिक असून भारतीय संविधानाच्या आधारे यासंदर्भात निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.समलिंगी विवाहामुळे भारतीय कुटुंब व्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता आहे. तसेच नात्यांमधील आणि महिला आणि मुलींमधील असुरक्षितता वाढीस  लावणारा हा निर्णय असून भारतीय संस्कृती ही विश्वाला मान्य आहे.संस्कृती धोक्यात येण्याचा यामुळे संभव आहे. त्यामुळे हा कायदा होऊ नये अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.या निवेदनावर सौ उज्वला मसलेकर सौ शर्मिष्ठा डांगे सौ प्रज्ञा महाजन यांच्या सह अनेक महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत

 
Top