तुळजापूर - 

भाजपा-शिवसेना युतीचा विजय हेच आपले लक्ष असुन पालकमंञी  मा.ना. तानाजीराव सावंत  यांनी राज्यपातळीवर  निवडणुकीत जे  भाजपा-शिवसेना युतीचे धोरण निश्चीत केले आहे, तेच . धाराशिव जिल्ह्यात बाजार समितीच्या निवडणुकीत राबवले जाणार आहे अशी माहीती शिवसेना जिल्हा प्रमुख मोहन पेनुरे यांनी प्रसिद्धी पञक काढुन दिली

पालकमंत्री मा.ना. तानाजीराव सावंत   व  भाजपाचे नेते आ. राणाजगजीसिंह पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार भारतीय जनता पार्टी व शिवसेना

एकत्रितपणे निवडणुका लढवत आहेत.  मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री  देवेन्द्र फडणवीस यांच्या

नेतृत्वाखाली सरकारने राज्यात व जिल्ह्यात देखील विकासकामांचा धडाका लावला असून शेतकरी हिताचे

अनेक निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील बाजार समितीचे मतदार शिवसेना-भाजपा च्या युतीच्या पाठीशी

ठामपणे उभे आहेत.  जिल्ह्यातील इतर बाजार समितीप्रमाणे तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुकदेखील

भाजपा व शिवसेना एकत्रित लढवत आहेत. असे असताना काल पालकमंत्री ना. तानाजीराव सावंत

साहेबांचा फोटो वापरून कांही लोक मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत   सर्व शिवसेना नेते, कार्यकर्ते भाजपा-

शिवसेना पुरस्कृत श्री तुळजाभवानी शेतकरी विकास पॅनलच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत.

तुळजापूर तालुक्यातील शिवसेनेचे सर्व नेते व कार्यकर्ते यांनी कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता

श्री तुळजाभवानी शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे  तानाजीराव सावंतयांंचेआदेश आहेत.


 
Top