परंडा /प्रतिनिधी -
कृषी उत्पन्न बाजार समिती परंडा च्या 2023 ते 28 या पंचवार्षिक निवडणुकी संदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस वंचित बहुजन आघाडी या सर्वांनी मिळून शेतकरी महाविकास आघाडीच्या पॅनल करून कृषी उत्पन्न बाजार समिती लढण्याची ठरवले असून प्रचाराची डोअर टु डोअर प्रचार सुरु झाला आहे. भूम परंडा वाशीचे माजी आमदार राहुल मोटे, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी परंडा येथी शासकीय विश्राम गृह येथे संयुक्त बैठक बोलावून सर्व उमेदवार व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करून सर्व च उमेदवार निवडून आणण्याचे आवाहन केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते दादासाहेब पाटील , अशोक बाबा पाडुळे, विश्वनाथ आबा खुळे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेचे तालुका अध्यक्ष मेघराज पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष अॅड. संदीप पाटील, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे , उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेचे जयकुमार जैन, शंकर जाधव, माजी सभापती शंकर इतापे, जनार्धन मेहर साहेब, शब्बीर पठाण ,काँग्रेसचे रमेशसिहं परदेशी, बाळासाहेब पाटील डोंजा , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संजय पवार, धनंजय हांडे, ऍडव्होकेट सुजित देवकते, दत्तात्रय पाटील, बापूसाहेब मिस्किन, हनुमंत कोलते पाटील, पंकज नाना पाटील, धनंजय पाटील, हारून भाई मुल्ला, एडवोकेट अमोल करळे, चंद्रकांत पाटील, महेश खुळे, अमोल काळे, अमोल जगताप, सोमनाथ शिरसट, रवींद्र जगताप, शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नसीर शहा बर्फीवाले, जावेद पठाण, समता परिषद, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नंदू शिंदे, श्रीहरी नाईकवाडी, दीपक पाटील, हरी नलवडे, नवनाथ ओव्हाळ, किरण शिंदे, देशमुख, शेतकरी महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.