कळंब/ प्रतिनिधी-

 शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, इंजिनिअर अशा अनेक क्षेत्रात गावातील अनेकांनी नावलौकिक मिळविला. मात्र गावातून पहिल्यांदाच न्यायाधिश बनली तीही सुनेच्या रुपाने याचा आगळावेगळा आनंद सोहळा सौंदाण्यात ग्रामस्थांनी  ठेवला आहे.

   तालुक्यातील सौंदया (अंबा) या ठिकाणी गुरुवारी (दि.२७) सकाळी ९ वाजता हा सोहळा होत आहे. गावातील अ‍ॅड अनुश्री सूरज गायकवाड यांची दिवाणी न्यायाधिश व न्याय दंडाधिकारी वर्ग-एक या पदावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने नुकतीच निवड करण्यात आली आहे. त्यांच्या सन्मानार्थ हभप दिनकर बाबा नायगावकर यांचे किर्तन आयोजित करण्यात आले आहे. यावेळी कळंबच्या उप विभा अधिकारी अहिल्या गाठाळ यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सोहळयास पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी उपस्थित रहावे, असे आवाहन माजी कुलगुरु, प्राचार्य मधुकर गायकवाड, निळकंठ गायकवाड व बाळासाहेब गायकवाड यांच्यासह ग्रामस्थांनी केले आहे. 
Top