तुळजापूर / प्रतिनिधी-

वनवास याञेचा कार्यक्रम शिवराज्य  अभिषेक दिनी ठेवणे शिवराज्य अभिषेक उत्सवाला गालबोट लावण्यासाठी षढयंञ   असुन घर व दुकानदारी चालविण्यासाठी हे उधोग असुन आरक्षण मिळवण्यासाठी नाहीत असा आरोप  मराठा समाजाचा विविध पदाधिकारी यांनी पञकार घेवुन शनिवार दि. २९रोजी केला.

या वेळी बोलताना मराठा समाजाचे विविध पदाधिकारी  म्हणाले की,  तुळजापूर धाराशिव जिल्ह्यातील मराठा क्रांती ठोक मोर्चा चे समन्वयक कार्यकर्ते आणि समाज बांधवांच्या वतीने मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये सातत्याने भूमिका मांडलेले आहेत आंदोलन केलेली आहेत मोर्चे  काढलेले आहेत आणि राज्यातील जे जे आंदोलन झाले त्या सर्व आंदोलनांमध्ये राज्यस्तरीय बैठकीमध्ये जे काही निर्णय होतात त्यामध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत.

     तुळजापूर मधून आजची पत्रकार परिषद घेण्याचा मुख्य उद्देश म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे या मागणीसाठी गेल्या 40 वर्षापासून आरक्षणाची मागणी सर्व राज्यभरातून होत आहे परंतु वेळोवेळी बदलणारी सरकार  व शासन शासन यांच्यामधील समन्वयक नसल्यामुळे अनेक वेळा मराठा आरक्षण मिळू शकला नाही.

मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये समस्त धाराशिव जिल्हा तुळजापूर तालुक्याच्या वतीने सरकारकडे खालील प्रमाणे आम्ही मागणी करत आहोत.मराठा समाजाला सामाजिक शैक्षणिक आर्थिक मागास असणाऱ्या सर्व समाज बांधवांना आरक्षण मिळावे.

  गायकवाड आयोगाच्या मध्ये ज्या काही त्रुटी सुप्रीम कोर्टाने दाखवलेले आहेत त्या त्रुटी दूर करण्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाच्या नवीन आयोग गटित करावा व मराठा समाजातील सामाजिक शैक्षणिक मागास आर्थिक असणाऱ्या घटकांना मागास घोषित करावे. राज्यातील तमाम सर्व मराठा समाजाची महत्त्वाची जी मागणी आहे ती म्हणजे सामाजिक शैक्षणिक मागास असणाऱ्या मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा.  मराठा क्रांती ठोक मोर्चा च्या वतीने या निवेदनाद्वारे सरकारला सूचित केले जात आहे की स्वयंघोषित अभ्यासक समन्वयक याचिकाकर्ते यांच्या कोणत्याही बैठका न घेता सरकार व शासन स्तरावर ती आता थेट बैठका घेऊन मराठा समाजाला आरक्षण द्यावे.

    मराठा क्रांती मोर्चा असेल मराठा क्रांती मूक मोर्चा असेल व सर्व मराठा संघटनांच्या वतीने राज्यातील राज्यस्तरीय बैठकीमध्ये सर्व समावेशक मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आंदोलन मोर्चे घोषित होतील त्यास समाज मान्यता दिली जाईल आणि त्यामध्ये राज्यातील तमाम सर्व मराठा समाज सामील होईल. मराठा आरक्षणावरती गट तट करून चार-पाच चार-पाच लोक एकत्र येऊन वैयक्तिक स्वार्थासाठी काही आंदोलने मोर्चे यात्रा जाहीर करत आहेत ही सर्व आंदोलने मुंबईमध्ये गेल्यानंतर संबंधित मंत्री मुख्यमंत्री यांना भेटून उरकून टाकले जातात आणि केवळ मराठा आरक्षणाच्या नावावरती आर्थिक सेटलमेंट साठी असे मोर्चे आंदोलने काढले जातात याचा व मराठा समाजाचा कोणताही संबंध राहणार नाही किंवा मराठा समाज यामध्ये सामील होणार नाही.. धाराशिव जिल्हा त्याचप्रमाणे तुळजापूर तालुक्यामध्ये स्थानिक मराठा समन्वयक सर्व संघटना स्थानिक पदाधिकारी यांच्या व्यतिरिक्त बाहेरील कोणी विकसित तुळजापूर या ठिकाणी येऊन आंदोलन जाहीर करून स्थानिक मराठा समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल आरक्षणाच्या बाबतीत दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते या तुळजापूर मध्ये चालू देणार नाही अशी कोणतीही आंदोलन आम्ही या ठिकाणी होऊ देणार नाही आणि अशा करण्याचा कोणी प्रयत्न केला तर अशा स्वयंघोषित आंदोलकांना आम्ही ठोकून काढल्याशिवाय गप्प बसणार नाही.. राज्यात कोणत्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये अशी कोणतीही वैयक्तिक आंदोलने मोर्चे होतील यामध्ये  मराठा समाजाचा आणि या लोकांचा कोणताही संबंध राहणार नाही आरक्षणाच्या नावाखाली दिशाभूल करणाऱ्या टोळ्यांना  यापुढे समाजातील युवक फोडून काढल्याशिवाय राहणार नाही.. राज्यात जाहीर केलेल्या 75 हजार मेगा भरती मध्ये मराठा समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे सर्व विभागांमध्ये 13% प्रमाणे जागा मिळाव्यात त्याचप्रमाणे ईडब्ल्यूएस मध्ये दहा टक्के जागा देण्यात याव्यात त्याचप्रमाणे खुल्या वर्गाच्या सर्व जागा जाहीर कराव्यात.

नोकर भरती मध्ये पोलीस भरती मध्ये मराठा व खुल्या वर्गातील सर्व जागा गायब केलेले असून या भरती प्रक्रियेमध्ये मराठा व खोल्या वर्गातील युवक उध्वस्त होत आहे त्याच पद्धतीने सरकारने जाहीर केलेल्या 10% ईडब्ल्यूएस आरक्षण मधील जागा दिलेल्या नाहीत सरकार आणि शासनाला विनंती आहे की आता या परीक्षा होण्यापूर्वी मराठा खुला वर्गातील त्याचप्रमाणे ईडब्लूएच्या सर्व जागा देण्यात याव्यात आणि मगच नोकर भरती करावी.

 आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सरकारला मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा देण्यात येत आहे एक महिन्याच्या आत मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये सरकारने उपसमितीची बैठक घेऊन मराठा आरक्षणाची भूमिका जाहीर करावी त्याचप्रमाणे आधी आरक्षण मग नोकर भरती करावी अन्यथा मराठा क्रांती ठोक मोर्चा पुन्हा राज्यव्यापी बैठक घेऊन पुढील दिशा जाहीर करून सरकारच्या विरोधात आरक्षण मिळेपर्यंत न संपणारे आंदोलन जाहीर करण्यात येईल . 

या वेळी  आपले मराठा क्रांती ठोक मोर्चा राज्य समन्वयक. अर्जुन   साळुंके, महेश गवळी, अजय भैय्या साळुंके, विकास वाघमारे, कुमार टोले, नितीन जट्टे, वैजनाथ सुरवसे, सत्यजित साठे,रोहन, देशमुख, ज्ञानेश्वर घोगरे, स्वराज मनसुके उपस्थित होते.


 
Top