धाराशिव / प्रतिनिधी-

डॉ.पदमसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन शनिवार दि.२९ एप्रिल २०२३ रोजी केशेगाव, ता.धाराशिव येथे सकाळी १०:०० ते ४:०० या वेळेत करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात केशेगाव व परिसरातील सर्व वयोगटातील ५५० महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.

 कार्यक्रमाचे उदघाटन सरपंच अभिजीत कोळगे यांच्या हस्ते झाले प्रमुख पाहुणे उपसरपंच बालाजी शिंदे, मा.जि.प सदस्य भारत डोलारे, मा.सरपंच अमोल पाटील, अमोल नवले, युवा भाजपा नेते गौतम ठेले, महेश चांदने, रंगनाथ कोळगे, चंद्रशेखर कोळगे, हसन शेख, प्रभूलिंग वाघाळे, हनमंत काळे, महादेव शिंदे रामेश्वर वाघे, शोभा वाघे, सविता शिंदे इत्यादी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.‍ अजित निळे, डॉ.दानिश पटेल, डॉ.वेदांत शहा, डॉ. नियती संगवे, डॉ. खुशबू रुंगता, डॉ. विपूल जैस्वाल यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे आमिन सय्यद, विनोद ओव्हाळ, पवन वाघमारे,  निशिकांत लोकरे व केशेगाव आरोग्य केंद्राच्या आशा कार्यकर्त्या पल्लवी ढोबळे, वंदना गवळी, निता सातपुते, गट प्रवर्तक अंजली खराटे यांनी परीश्रम घेतले.


 
Top