धाराशिव/ प्रतिनिधी-

सतत सामाजिक चळवळीत गतिशील असलेले संत साहित्याचे अभ्यासक व श्री साई श्रध्दा एज्युकेशनचे संचालक प्रा. सोमनाथ लांडगे व उषाताई लांडगे यांचा महाराष्ट्र पोलीस टाईम्सच्या वतीने सन्मान करण्यात आला. 

 या दोघांच्याही सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत महाराष्ट्र पोलीस टाईम्सच्या वतीने धाराशिव येथे मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सन्मान करण्यात आला. या  कार्यक्रमाला  उमेश काळे, पोलीस निरीक्षक देवकन्या मैंदाड  , पोलीस निरीक्षक अजिनाथ काशिद  , डॉ. संतोष पाटील, धर्मादाय आयुक्त पाईकराव  , प्रदीप मगर, डॉ. भुतेकर, अॅड. विद्या साखरे, अॅड मनिष वाघमारे, सुनील वाकडे, चंद्रकांत हजारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


 
Top