नळदुर्ग / प्रतिनिधी-

 केरळ येथील शिवप्रेमी युवक हमरास एम. के. यांचे ऐतिहासिक नळदुर्ग शहरात शिवप्रेमी नागरीकांकडुन जोरदार स्वागत करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

  केरळ राज्यातील कोतापुरम येथील रहिवासी असलेला शिवप्रेमी युवक हमरास एम. के. वय २६ हा युवक अकरा महिन्यात सायकलवरून ९ हजार किलोमीटरचा प्रवास करून राज्यांतील १६९ गड किल्ल्याना भेटी देत व किल्ल्यांचे दर्शन करीत दि.८ एप्रिल रोजी ऐतिहासिक नळदुर्ग शहरातील प्राचिन किल्ल्याला भेट देण्यासाठी नळदुर्ग शहरात आगमन झाले.याबाबतची माहिती मिळताच शहरातील सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक व शिवप्रेमी विनायक अहंकारी यांनी हमरास एम. के. या शिवप्रेमी युवकाचा सत्कार करण्याचा निर्णय घेतला. येथील राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात हमरास एम. के. या युवकाचा विनायक अहंकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक बसवराज धरणे, शिवसेनेचे उपतालुकप्रमुख सरदारसिंग ठाकुर, शहर प्रमुख संतोष पुदाले,भाजपाचे माजी शहर अध्यक्ष पद्माकर घोडके शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, पत्रकार विलास येडगे, तानाजी जाधव, भगवंत सुरवसे, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक रघुनाथ नागणे, मारुती घोडके,बलदेवसिंग ठाकुर, प्रविण चव्हाण, दिलीप डोंगरे यांच्यासह शिवप्रेमी नागरीक उपस्थित होते.विनायक अहंकारी यांनी शिवप्रेमी युवक हमरास एम. के. यांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था आपल्या निवासस्थानी केली आहे. 

 
Top