धाराशिव / प्रतिनिधी-

 भारतीय लहुजी पॅंथर सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी देवानंद एडके यांची निवड करण्यात आली आहे.

धाराशिव येथील देवानंद एडके हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करीत असून त्यांच्या कामाची दखल घेत त्यांची ही निवड भारतीय लहुजी पॅंथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपान झोंबाडे यांनी एका पत्राद्वारे केली आहे. दिलेल्या नियुक्ती पत्रामध्ये आपण समाजाचे प्रश्न मांडून त्यास न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे नमूद केले आहे. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी , खंडू झोंबाडे, मिलिंद पवार, नितीन माने,अविनाश शेळके, लक्ष्मण वाघमारे, सुरज कांबळे, उमेश साठे, विशाल कांबळे, शाम हिंगे, पृथ्वीराज देडे, अंकुश पेठे, बाळासाहेब थोरात आदी उपस्थित होते.


 
Top