मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई.

 

उस्मानाबाद शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.06 एप्रिल रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 82 कारवाया करुन 63,300 ‘तडजोड शुल्क’ वसुल केले आहे.

 लैंगीक अत्याचार.

 

 

तामलवाडी पोलीस ठाणे : एका गावातील एक 08 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. 07.04.2023 रोजी 16.00 वा.सु. गावातील घराशेजारील एका तरुणाने सदर मुलगी ही अल्पवयीन असल्याचा फायदा घेवुन तीला चॉकलेट बिस्कीट देवुन तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. अशा मजकुराच्या पिडीतेची वडील यांनी दि.07.04.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376, 376 (अ)(ब),376(2)(n) कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 अवैध मद्य विरोधी कारवाई .

उमरगा पोलीस ठाणे : त्रिकोळी रोड, उमरगा येथील- आलिम बशीर लदाफ हे दि.07.04.2023 रोजी 20.00 वा. सु. त्रिकोळी रोड उमरगा येथे अंदाजे 900  किंमतीच्या ताडी शिंदी दारुचा विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले, एकुरगा येथील- जितेंद्र कोंडीबा देडे हे याच दिवशी 22.23 वा. सु. एकुरगा शिवारात त्यांचेच यांचे शेतात अंदाजे 952
₹ किंमतीच्या गाहभ दारुचा चोरटा अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले.

      यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अंर्तगत  संबधीत  पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

 जुगार विरोधी कारवाई.

 

आनंद नगर पोलीस ठाणे : जुगार विरोधी कारवाई दरम्यान आनंदनगर पोलीसांनी दि.07.04.2023 रोजी आनंदनगर पो.ठा.हद्दीत  छापे टाकले. यावेळी आनंदनगर येथील- सुनिल लिबराज हांगे हे तेरणा कॉलेज जवळ पत्र्याचे शेडमध्ये धाराशिव येथे, मिलन नाईट मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 1040 रक्कम बाळगलेले, आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवलेला आहे.

नळदुर्ग पोलीस ठाणे : जुगार विरोधी कारवाई दरम्यान नळदुर्ग पोलीसांनी दि.07.04.2023 रोजी नळदुर्ग पो.ठा.हद्दीत  छापे टाकले. यावेळी आनंदनगर येथील- महिबुब खॉजाभाई मकामदार हे तमन्ना पान शॉपच्या बाजुला ईटकळ येथे, कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 1180  रक्कम बाळगलेले, आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवलेला आहे.

 मद्यपी चालकावर गुन्हा दाखल.

उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाणे : येडशी-येथील- किस्मत हसन शेख हे  दोंघे दि.07.04.2023 रोजी 12.45 वा. सु. आपआपल्या ताब्यातील ट्रॅक्टर क्रमांक ए.पी.25 आर 8895 ही मौजे येडशी दिल्ली दरबार हॉटेल समोरील चौकात आरोपी हा येथे रस्त्यावर निष्काळीपणे व मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द गुन्हा नोंदवला आहे.

रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद.

 

उमरगा पोलीस ठाणे : कुंभारपट्टी, उमरगा येथील- रमीजराजा युनुस व्हंताळे ता. उमरगा येथील या तिघांनी  दि. 07.04.2023 रोजी 12.45 वा. सु. आपापल्या ताब्यातील ॲपे रिक्षा क्र. एम.एच. 25 ए.के. ही वाहन सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायरीत्या उभे केलेले असताना उमरगा पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.स. कलम 283 अंतर्गत उमरगा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

हायगई व निष्काजीपणे वाहन चालविणाऱ्यावर गुन्हा दाखल

उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाणे : दिली दरबार हॉटेल समोर चौकात येडशी, ता. उस्मानाबाद येथील- राजकुमार बाळासाहेब ठवरे यांनी दि. 07.04.2023 रोजी 17.15 वा. सु. आपल्या ताब्यातील पिकअप गाडी क्रं. एम.एच.12 एफ .डी. 8969 ही वरील वर्णनाचे परिसर येथे सार्वजनिक रस्त्यावर लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल अशा हयगयीने व निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवताना उस्मानाबाद ग्रामीण पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.स. कलम 279 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 मालमत्तेविरुध्द गुन्हे.

येरमाळा पोलीस ठाणे :थोरात चाळ, दौंड येथील- सतीष नागनाथ राउत, वय 52 वर्ष या दि.07.04.2023 रोजी 10.30 वा.दरम्यान अमराई परिसर जवळ येरमाळा येथे पालखी मिरवणुकीत चुन्याच्या रानामध्ये गळयातील सोन्याची मणी, मंगळसुत्र हिस्कावुन घेवुन कोणीतरी अज्ञात व्यक्तीने घेवुन गेला आहे. वगैरे अशा मजकुराच्या सतीष राउत यांनी दि.07.04.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 392 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा पोलीस ठाणे :थोरे गल्ली, ता. औसा येथील- मीराबाई शिवाजी भुजबळ वय 60 वर्ष या दि.07.04.2023 रोजी 11.30 वा.दरम्यान येडेश्वरी देवी मंदीर येथे दर्शनासाठी आले होते. दरम्यान पालखी मिरवणुकीत चुन्याच्या रानामध्ये अज्ञात महिला हिने मीराबाई भुजबळ यांच्या गळयातील सोन्याची मणी मंगळसुत्र हिसकावुन घेवुन गेली आहे. अशा मजकुराच्या मीराबाई भुजबळ यांनी दि.07.04.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 392 अंतर्गत स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

 

येरमाळा पोलीस ठाणे :राजेगांव, ता. माजलगाव येथील- नारायण विष्णु कचरे, वय 28 वर्ष या दि.07.04.2023 रोजी 11.30 वा. दरम्यान येडेश्वरी देवी मंदीर येथे दर्शनासाठी आल्या होत्या. येडेश्वरी मंदीरा परिसरात अनोळखी व्यक्तीने खिशातील हीस्कावुन घेवुन पळुन गेला आहे. किंमत अंदाजे 12,000  किंमतीचा मोबाईल फोन लुटून पसार झाली.अशा मजकुराच्या नारायण कचरे यांनी दि.07.04.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 392 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा पोलीस ठाणे : बार्शी, ता.बार्शी येथील- सोमनाथ वामन जाधव वय 29 वर्ष दि.07.04.2023 रोजी 10.00 वा. दरम्यान येडेश्वरी देवी मंदीर येथे दर्शनासाठी आल्या होत्या कोणीतरी अज्ञात अज्ञात व्यक्तीने खीशातील पॉकीट कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेली. अशा मजकुराच्या सोमनाथ जाधव  यांनी दि. 07.04.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 392 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा पोलीस ठाणे : पैठण सावळेश्वर ता.केज येथील- हरिदास कारभारी चौधरी, वय 56 वर्ष यांनी दि.07.04.2023 रोजी 12.30 वा. दरम्यान येडेश्वरी देवी मंदीर येथे दर्शनासाठी आल्या होत्या. येडेश्वरी मंदीरा परिसरात अनोळखी व्यक्तीने खिशातील हीस्कावुन घेवुन पळुन गेला आहे. किंमत अंदाजे 10,000 ₹ किंमतीचा मोबाईल फोन लुटून पसार झाली.अशा मजकुराच्या हरिदास चौधरी यांनी दि.07.04.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 392 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा पोलीस ठाणे : गोजवाडा ता.वाशी येथील- आकाश दत्तात्रय गायकवाड, वय 24 वर्ष यांनी दि.07.04.2023 रोजी 12.30 वा. दरम्यान येडेश्वरी देवी मंदीर येथे दर्शनासाठी आल्या होत्या. येडेश्वरी मंदीरा परिसरात अनोळखी व्यक्तीने खिशातील वीवो कंपनीचा मोबाईल हीस्कावुन घेवुन पळुन गेला आहे. किंमत अंदाजे 10,000 ₹ किंमतीचा मोबाईल फोन लुटून पसार झाली.अशा मजकुराच्या हरिदास चौधरी यांनी दि.07.04.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 392 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

भुम पोलीस ठाणे : कुष्णापुर ता.भुम येथील- राहुल बापुराव कांबळे, वय 19 वर्ष यांनी दि.07.04.2023 रोजी 12.30 वा. राहुल कांबळे यांचे राहते घराचे समोर मौजे कृष्णापुर येथे त्यांचे घरासमोर असलेल्या गेटचे नट बोल्ट काडुन आत प्रवेश करुन कोणीतरी अज्ञात चोरटयाने तीन मोठया शेळ्या तसेच दिड ते दोन वर्षाच्या वय असलेल्या एकुण 06 शेळ्या दोन बोडे काळया रंगाचे चार पाठी असे एकुण 54,000/- रु चा शेळया, बोकडे, पाठीची चोरी कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेहले आहे.अशा मजकुराच्या राहुल कांबळे यांनी दि.07.04.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाणे : रामलिंग नगर येडशी ता. उस्मानाबाद येथील- रामलिंग सोमनाथ घोंगडे वय 35 वर्ष हे दि.02.04.2023 रोजी 23.00 वा. ते दि.03.04.2023 रोजीचे 06.00 वा चे दरम्यान घरासमोर लावलेली हिरो कंपनीची काळया रंगाची स्पेलेंन्डर प्लस कंपनीची मो सा क्रमांक एम एच 13 सी डी 1996 ही जु.वा.किं.अं.20,000/- रु ची कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या रामलिंग घोंगडे यांनी दि.07.04.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

भुम पोलीस ठाणे : बाजार रोड ता.भुम येथील- विवेक धर्मचंद्र पोखणी, वय 37 वर्ष यांनी दि.06.04.2023 रोजी 13.30 वा. विवेक पोखणी हे आठवडी बाजारात बाजार करत असताना कोणीतरी अज्ञात इसमाने रेडमी नोट 08 प्रो कंपनीचा मोबाईल किं.अं. 10000/- रु चो मोबाईल खिशातुन चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या विवेक पोखणी यांनी दि.07.04.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे : जुना बस डेपो उस्मानाबाद येथील  - प्रविण संतोष साळुंके वय 29 वर्ष यांनी दि.05.04.2023 रोजी 09.00 वा. प्रविण साळुंके यांचे देखरेखी खाली हंबीरे पेट्रोल पंप येथे कामकाजा करीता असताना येणारे जाणारे वाहनांना पेट्रोल डिझेल भरुन जमा झालेली रक्कम 60,000/- रु जमा न करता गौतम राजेंद्र विधाते हे चोरुन घेवुन परस्पर निघुन गेला आहे. अशा मजकुराच्या प्रविण संतोष साळुंके यांनी दि.07.04.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 381 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 शासकीय कामात आडथळा.

आनंदनगर पोलीस ठाणे : बसस्थानक परिसर धाराशिव येथे ताई कुमार बळशंकर वय 28 वर्ष यांनी दि.07.04.2023 रोजी 18.45 ते 19.00 वा चु सुमारास बसमध्ये वाटेत ठेवलेले पोते बाजुला घ्या प्रवाशी येणे व जाणेस आडचण होत आहे. असे बोलले असता, 1. आशाबाई नाना चव्हाण 2. शारदा राजेंद्र राठोड यांनी ताई बळशंकर यांचा हात पिरगाळला व तेथे असलेले मपोअं खोत यांना आशाबाई यांनी शिवीगाळ केली व केसाला धरुन बस मध्ये मारहाण केली व धमकी दिली. अशा मजकुराच्या ताई बळशंकर यांनी दि.07.04.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353,332,504,506,34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                        

 
Top