कळंब / प्रतिनिधी-

 कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी पाटिवर शुक्रवार दिनांक 28/4/2023 रोजी सकाळी साडे सात वाजता  एका पुरुष जातीचे मृतदेह सापडल्याची खळबळ जनक घटना घडली आहे.

 सविस्तर माहिती अशी की, कन्हेरवाडी  पाटिवर व आंदोरा शिवरात असणाऱ्या आंदोरा शिवारातील गट नंबर 568 मध्ये असणाऱ्या श्री.शहाजी राजाराम काळे यांच्या शेतात असणार्‍या पडक्या पत्र्याच्या शेड मध्ये अंदाजे वय 50 ते 55 वर्षाचे  पुरुष जातीचे मृतदेह आढळून आला आहे शिवारात राहणाऱ्या शेतमालक शहाजी राजाराम काळे सकाळी लघुशंकेसाठी पत्र्याच्या शेडजवळुन जात असताना भरपूर प्रमाणात दुर्गंधी येत असल्यामुळे शेडमध्ये पाहिले असता त्याशेडमध्ये डोकावले असता त्यांना पुरुष जातीचे मृतदेह असल्याचे आढळून आले त्यानंतर त्यांनी तात्काळ ही घटना त्यांचे बंधु बिभिषण राजाराम काळे यांना सांगितली व त्यांनी हि माहिती मोबाईल फोनवरून     पोलीस स्टेशन कळंब यांना मृतदेह असल्याची बातमी कळवली ही माहिती समजतात पोलीस स्टेशन कळंबचे पोलिस निरीक्षक सुरेश साबळे , पोलिस उपनिरीक्षक चाटे,   बिटआमदार दळवि व पतंगे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व सदरील घटनेचा पंचनामा करण्यात आला. मृतदेह सडलेल्या  अवस्थेत असल्यामुळे त्यामुळे शिवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये घेऊन जाणे अशक्य होते. त्यामुळे आरोग्य केंद्र ईटकुरचे वैद्यकीय अधिकारी यांना घटनास्थळी बोलवुन त्या मृतदेहाचे जागीच शवविच्छेदन करण्यात आले व व्हि.सी.आर राखून ठेवण्यात आला असुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे व जवळच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.मृतदेहाची ओळख पटलेली नसुन परिसरात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चाटे बिट अमलदार दळवी हे करत आहेत.


 
Top