धाराशिव / प्रतिनिधी-

शहरातील सांजा परिसरात  पानटपरी चालक असलेल्या राम मोहिते मर्डर प्रकरणी दोन भाऊ आणि तीन जावई अश्या पाच जणांविरुद्ध बुधवारी रात्री आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकास अटक करण्यात आली आहे. त्यास ३० एप्रील पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अन्य चार  आरोपींच्या शोधासाठी दोन पोलिस पथके रवाना झाल्याचे सांगण्यात आले आहे.

    शहरातील सांजा चौकात बुधवारी भर दुपारी   एका तरुणाचा धारदार शस्त्राने‌ एक पाय व दोन हात तोडून निर्घृण खून करण्यात आल्याने खळबळ उडाली होती.

 पानटपरी चालक असलेल्या राम मोहिते या तरुणाचा सांजा रोड वरील सिद्धेश्वर गृह निर्माण सोसायटीच्या समोर शेतीच्या बांधाच्या वादातून गावातीलच पाच अज्ञात तरुणांनी बुधवारी रोजी दुपारी   धारदार शस्त्राने हात आणि पायावर वार करून निर्घृण हत्या केली.

  या खूना प्रकरणी आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये बुधवारी रात्री उशिरा दोन भाऊ आणि तीन जावई अश्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, पैकी एकास पोलिसांनी अटक केली आहे.

मयत राम मोहिते आणि आरोपीमध्ये शेतीच्या बांधावरून मागील अनेक दिवसापासून वाद होता. एक महिन्यापूर्वी मोहिते याने आनंदनगर पोलिसात तक्रार दिली होती, पण पोलिसांनी आरोपीविरुद्ध कसलीही कारवाई केली नाही, पोलिसांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे त्याचे पर्यावसान मर्डरमध्ये झाले आहे.

यामुळे गावसुद हत्याकांड 

कांही वर्षांपुर्वी धाराशिव तालुक्यातील गावसुद येथे शेतीच्या वादावरून दोन सख्या भावात भांडण होवुन हत्याकांड झाले होते.   पोलिसांनी वेळीच दखल न घेतल्यामुळे गावसुद मध्ये  हत्याकांडापर्यंत हे प्रकरण गेले होते. सांजा येथील प्रकरणातही मोहिते परिवाराने शेतीच्या वादा संदर्भात  महिनाभरापुर्वी आनंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.  

 
Top