धाराशिव / प्रतिनिधी-

भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन व आपल्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून धाराशिव शहरातील राष्ट्रवादीचे व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील सक्रिय युवक कार्यकर्ते,चैतन्य माने,सौरभ काकडे,अमित जगताप,समर्थ लवटे,करण काकडे,माऊली असलेकर,कृष्णा असलेकर,प्रथमेश असलेकर,कुणाल देवकते,रोहित अणदुरे,महेश काकडे,धनंजय धावकर,अभिषेक कल्याणकर,युवराज हवलदार, स्वस्तिक लिंगे, शिवरत्न नलावडे,आदित्य घोगरे,निखिल घुमटे,अनिकेत साबळे,रोहित जगताप यांनी माजी उपनगराध्यक्ष अभय इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते पक्षात जाहिर प्रवेश केला. भाजपा कार्यालय, धाराशिव येथे संपन्न झालेल्या या पक्ष प्रवेश कार्यक्रमात सर्वांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.

 याप्रसंगी भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजित देवकते, प्रविण सिरसाठे, सागर दंडनाईक आदी उपस्थीत होते.

 
Top