तेर/  प्रतिनिधी 

धाराशिव तालुक्यातील श्री संत गोरोबा काका यांच्या वार्षिक यात्रेस 15 एप्रिल पासून प्रारंभ होत आहे. आज 15 एप्रिलला महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणाहून परंपरेनुसार फडकरी ,दिंड्यांचे तेरमध्ये आगमन होत आहे. सायंकाळी ह.भ. प. भाऊसाहेब महाराज गोसावी यांचे कीर्तन होणार आहे. 

16 एप्रिलला पहाटे आ. राणाजगजीतसिंह पाटील यांच्या हस्ते महापूजा. करण्यात येणार आहे. सकाळी नऊ ते अकराच्या दरम्यान श्री संत गोरोबा काकांच्या पालखीची व राज्यातून आलेल्या दिंड्यांची नगर प्रदक्षिणा होणार आहे. सायंकाळी ह .भ. प. बाळासाहेब महाराज देहूकर यांचे कीर्तन होणार आहे. रात्री दहा ते पहाटे चार पर्यंत मौजे काळेगाव व गोरोबा काकांच्या पारंपारिक वारकऱ्यांचा सामुदायिक जागर होणार आहे. 17 एप्रिलला सकाळी आठ ते दहा पर्यंत तेरकर यांची पारंपारिक किर्तन सेवा होणार असून सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान परिसरातील सर्व वारकऱ्यांचा सामुदायिक हरिपाठ होणार आहे सायंकाळी सात ते नऊ पर्यंत ह .भ. प .शंकर महाराज थोबडे यांचे कीर्तन होणार आहे. रात्री दहा ते पहाटे चार पर्यंत मौजे उंडेगाव व गोरोबा काकांच्या पारंपारिक वारकऱ्यांचा सामुदायिक हरीजागर होणार आहे. 18 एप्रिल रोजी सकाळी आठ ते दहा पर्यंत ह. भ .प .दत्तात्रय महाराज अंबीलकर यांचे कीर्तन होणार असून सकाळी दहा ते बारा पर्यंत श्री संत गोरोबाकाका समाधी उत्सव  गुलाब पुष्प उधळण  सोहळा होणार आहे. सायंकाळी सात ते नऊ पर्यंत ह. भ. प .कान्होबा महाराज देहूकर यांचे कीर्तन होणार आहे. रात्री दहा ते पहाटे चार पर्यंत श्रीक्षेत्र तेर व गोरोबा काकांच्या पारंपारिक वारकऱ्यांचा सामुदायिक हरिजागर होणार आहे. 19 एप्रिलला पहाटे पाच ते सहाच्या दरम्यान श्री संत गोरोबा काकांच्या पालखीची छबिना मिरवणूक निघणार आहे. सकाळी दहा ते बारा पर्यंत श्री .लक्ष्मी नरसिंह मंदिर येथे काल्याचे हजेरी कीर्तन व गोपाळकाला  कार्यक्रम होणार आहे. दुपारी तीन ते सहाच्या दरम्यान कुस्त्यांचा कार्यक्रम व त्यानंतर समाधी सोहळा उत्साहाची सांगता होणार आहे. 22 एप्रिलला श्री संत गोरोबा काकांच्या वार्षिक यात्रा उत्सवाची सांगता होणार आहे. याचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन सहाय्यक धर्मादाय आयुक्त एस.पी. पाईकराव, धाराशिव येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाचे निरीक्षक श्रीपाल बनसोडे यांनी केले आहे.


 
Top