धाराशिव / प्रतिनिधी- 

धाराशिव जिल्हयाच्यावतीने माजी सैनिकांची जंतर मंतर नवी दिल्ली येथे २० फेब्रुवारी २०२३ पासून अनिश्चत काळासाठी उपोषणास बसलेल्या सैनिकांना पाठींबा दर्शविण्यासाठी व वन रँक वन पेन्शन व इतर मागण्यासाठी पदयात्रा काढण्यात आली.यामध्ये मोठ्या  संख्येने माजी सैनिक  सहभागी झाले होते.

यावेळी जिलाधिकारी यांना आपल्या मागण्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी  

सैनिक फेडरेशन धाराशिवचे जिल्हाध्यक्ष  बाळासाहेब जावळे, सचिव  लक्ष्मण इंगळे, कार्याध्यक्ष- अशोक गाडेकर. तसेच शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना, महाराष्ट्र राज्य जिल्हा धाराशिवचे जिल्हाध्यक्ष  ज्ञानदेव गुंड, उपाध्यक्ष - हनुमंत कुदळे ,  अरुण मगर, चंद्रकांत ओहाळ, संताजी भोसले, सुधाकर लोमटे, संजय शिंदे, बाळासाहेब थोडसरे , हेमंत देशमुख,   प्रभाकर हाके, उपाध्यक्ष- लक्ष्मण पौळ, कार्याध्यक्ष  पोपटराव जाधव,   कानिफनाथ मोराळे, कल्याण मुंडे, एड. भगवान नागरगोजे, शिवाजीराव चव्हाण ,  तुकाराम चव्हाण  तसेच    माजी सैनिक बांधव मोठया संख्येने हजर होते. तसेच जिल्हयातील माजी सैनिकांच्या विधवा पत्नी पदयात्रेत सहभागी होत्या


 
Top