तुळजापुर  / प्रतिनिधी- 

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात दोन दिवशीय  तुळटेक फेस्टिवल 2023 चा समारोप स्वामी ऍग्रोचे उद्योजक अभि. कुमारस्वामी यांच्या हस्ते झाले. 

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.रवी मुदकन्ना, समन्वयक प्रा.संजय आखाडे, प्रबंधक सुजाता कोळी सर्व विभागप्रमुख उपस्थित होते . दोन दिवस चालेल्या फेस्टिवलमधील  स्थापत्य, संगणक ,यांत्रिकी व अणुवैजिक आणि दळणवळण या चार अभियांत्रिकी शाखेतील प्रोजेक्ट प्रेझेंटेशन,प्रोग्रामिंग , रेबो रेस ,डिबिबिंग, कँडवाँर या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. यात तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय तुळजापूर, तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय व शासकीय तंत्रनिकेतन धाराशिव यांनी विविध स्पर्धेत विजेतेपद पटकावून प्रथम स्थान मिळविले.  या स्पर्धेत  सोलापूर, लातूर, बीड ,संभाजीनगर व धाराशिव या जिल्ह्यातील अभियांत्रिकी व तंत्रनिकेतनमधील चारशेच्यावर विद्यार्थी विद्यार्थ्यांनीने सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संजय आखाडे सूत्रसंचालन वैष्णवी स्वामी व प्रगती थोरात या विद्यार्थिनींनी केले तर आभार प्रा. विश्वास पतंगे  यांनी मानले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून महाविद्यालयातील विभागप्रमुखांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीते साठी सहसमन्वयक प्रा.विजय म्हाळगी,  प्रा. डॉ. एन.डी. पेरगाड,प्रा.डॉ. धनंजय खुमणे ,प्रा. वैभव पानसरे ,प्रा.दिपक शिंदे , प्रा. जिलानी शेख, प्रा.गिरीश ओवरीकर  ,प्रा.संतोष एकदंते ,प्रा.अजिंक्य हंगरगेकर ,प्रा. विवेक गंगणे ,प्रा. शंकर वडणे, प्रा. कारंजकर ,प्रा.बुरंगे प्रा.पाचकवडे व कर्मचारी समिती सदस्य विद्यार्थ्यांनी  परिश्रम घेतले. सदरच्या स्पर्धा व्यवस्थापक तहसीलदार योगिता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या.

 
Top