धाराशिव / प्रतिनिधी- 

धाराशिव जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी डॉ.स्मिता शहापूरकर यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष माजी राज्यमंत्री बसवराज पाटील, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण व जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.धीरज पाटील यांच्या हस्ते निवडीचे पत्र डॉ.शहापूरकर यांना देण्यात आले. या निवडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधून स्वागत होत आहे.

 डॉ.शहापूरकर यांनी यापूर्वी महाराष्ट्र प्रदेश महिला कॉग्रेसच्या सचिव, उपाध्यक्ष पदावर बारा वर्ष काम केले. महिला कॉग्रेसच्या तत्कालीन प्रदेशाध्यक्ष कमलताई व्यवहारे, अ‍ॅड. चारुलता टोकस यांच्यासोबत त्यांनी प्रदेश पातळीवर काम केले आहे. मध्यंतरी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या जनमानसाची शिदोरी या मुखपत्राच्या संपादक मंडळावरही त्यांनी काम पाहिले.

 त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याची दखल घेऊन काँग्रेस पक्षाच्या मजबूतीसाठी जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जिल्ह्यातील कॉग्रेस पक्षाचे सर्व अनुभवी आणि निष्ठावान कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचे नेहमीच सहकार्य आणि अनुभवाचे पाठबळ मिळत आले आहे असून अशा प्रोत्साहनामुळे अजून जास्त काम करण्याची ऊर्जा निर्माण झाली असल्याचे निवडीनंतर नूतन जिल्हा उपाध्यक्ष डॉ.शहापूरकर यांनी सांगितले.

 यावेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप भालेराव, जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे,  जिल्हा संघटक राजेंद्र शेरखाने, वरीष्ठ उपाध्यक्ष खलील सय्यद, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत, कळंब  तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार, जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड.जावेद काझी, डीसीसी बँकेचे संचालक महेबूब पटेल, पृथ्वीराज देडे, आवेज शेख ज्योती सपाटे,  मंजुषा शिंदे, अलका वीर, सुवर्णा वीर, रहेमुन्निसा शेख व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top