धाराशिव/ प्रतिनिधी -        

 तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळणि येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त जोतिबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व मुख्याध्यापक उपस्थित होते यावेळी मुख्याध्यापक श्री बशीर तांबोळी यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला व सर्व मुलींनी किमान पदवीधर होई पर्यंत शिक्षण घेण्याचे आवाहन केले यावेळी  उपस्थित महिला शिक्षिका श्रीमती सत्याशिला मेहेत्रे ,श्रीमती  राधाबाई वीर श्रीमती  वर्षा डोंगरे श्रीमती  मंजुषा नरवटे श्रीमती  क्रांती मते , श्रीमती सुलाक्षिना  ढगे यांनी सर्व विद्यार्थ्यांना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्याचा सविस्तर व सखोल परिचय करून दिला.              

  कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील प्राथमिक पदवीधर शिक्षक श्री उत्तम काळे, तंत्रस्नेही शिक्षक श्री हनुमंत माने, व श्री दत्ता डावकरे यांनी मोलाची परिश्रम घेतले तसेच शेवटी श्री उत्तम काळे यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.


 
Top