धाराशिव/ प्रतिनिधी -        
७ ते ९ एप्रीलच्या दरम्यान जिल्हयात अवकाळी व गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीची पहाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन केली. दौऱ्याची सुरुवात तुळजापूर तालुक्यातील मोर्डा येथुन सुरू झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी धाराशिव तालुक्यातील वाडीबामणी येथील नुकसानीची पहाणी केली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा सांगून तातडीने मदत करण्याची मागणी केली. यावेळी मुख्यमंत्री यांनी एका ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, नुकसानग्रस्तांना युध्दपातळीवर पंचनामे करून तत्काळ मदत केली जाईल, असे आश्वासन माध्यमांशी बोलताना  दिले. 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,   पालकमंत्री तानाजी सावंत, अामदार राणाजगजितसिंह पाटील, अामदार कैलास पाटील, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, विशेष पोलिस महानिरीक्षक के.एम.प्रसन्न, जिल्हाधिकारी डाॅ. सचिन  ओम्बासे, पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी, जि.प.चे मुख्यकार्यकारी अिधकारी राहुल गुप्ता आदी या दौऱ्यात उपस्थित होते.    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीमती सीताबाई उत्तम सुरवसे आणि उत्तम सुरवसे (रा. मोर्डा ता. तुळजापूर) या दांपत्याच्या द्राक्ष बागेची पाहणी केली. दोन एकर क्षेत्रावरील द्राक्ष बागायत 8 एप्रिलच्या वादळी पावसाने भुईसपाट झाली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दांपत्याची  विचारपूस केली.. त्यांना धीर दिला. कोणकोणते कर्ज आहेत याची विचारपूस केली.  पूर्णपणे सपाट झालेल्या द्राक्ष बागेत रस्ता काढत आत मध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांनी नुकसानाची पाहणी केली.  त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा वाडीबामणीकडे आला. तेथे त्यांनी शेतकरी बाबासाहेब उमरदंउ यांच्या भुईसपाट झालेले ज्वारीचे पीक, कलींगडे, ड्रायगन फ्रुट आदी नुकसानग्रस्त बागेची पहाणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री तुळजापूरकडे रवाना झाले. यावेळी अामदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री यांना निवेदन देत पीकविमा  कंपनीच्या मुजोर वृत्तीला चाप लावून सततचा पाऊस अतिवृष्टीचे गहु, ज्वारी, कांदा पिकाच्या नुकसानीचे पैसे तातडीने द्यावे, अशी मागणी केली. जिल्हयात १० महिन्यात ११७  शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे झालेल्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांच्या  खात्यावर कधी जमा होणार, हे आजच जाहीर करावे, अशी मागणी अामदार केलास पाटील यांनी केली. 

घरात बसणारा मुख्यमंत्री नाही
ज्या-ज्या वेळेस राज्य संकटात येते त्या-त्या वेळेस आम्ही स्वत: रस्त्यावर उतरत आहोत. घरात बसून कामकाज करणारा मी मुख्यमंत्री नाही, मी स्वत: शेतकऱ्यांचा मुलगा असल्यामुळे शेतकऱ्यांशी अस्था असल्यामुळेच शेतातील बांधावर आलो. आदित्य ठाकरे यांच्या फोटो काढण्याच्या वक्तव्याबाबत लोकांना आमच्या सोबत फोटो काढायला आवडते. लोक कोणासोबत ही फोटो काढत नाहीत, असा टोला ही शिंदे यांनी लगावला. महाविकास आघाडीबाबत बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी ज्या कार सेवकांवर आयोध्यामध्ये गोलीबार केला, अशा लोकांसोबत तुम्ही साटेलोटे केले, अशी टिका ही शिंदे यांनी केली. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा बाबरी मशीद पाडण्यामध्ये काहीही संबंध नाही या सदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत मुख्यमंत्री शिंदे बाळासाहेब ठाकरे यांच्यावर बाबरी मस्जिद पाडण्यासंदर्भात गुन्हे दाखल झाले आहेत असून मंत्री चंद्रकांत पाटलांशी आपण स्वत:बोललो आहोत. परंतू विरोधक त्यांचा विपर्यास काढून स्वत:ची पोळी भाजून घेत आहेत अशी टिका केली. 
 
Top