जळकोट / प्रतिनिधी-                                                             

 जळकोट ता. तुळजापूर येथील रहिवाशी असलेले व जवाहर महाविद्यालय अणदूर येथे प्राध्यापक म्हणून सेवेत असलेले विरभद्रेश्वर सामलिंग स्वामी यांनी "ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरणांमध्ये महिला बचत गटाचे योगदान: एक समाजशास्त्रीय अभ्यास" (विशेष संदर्भ- उस्मानाबाद जिल्हा) या विषयावर त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्याकडे  संशोधन प्रबंध सादर केला होता. त्यामुळे विद्यापीठाकडून समाजशास्त्र विषयात केलेल्या संशोधनाबद्दल  "विद्यावाचस्पती" म्हणजेच  ( पी.एच.डी. ) पदवी केली.  त्यामुळे जळकोट येथील मित्रपरिवारातर्फे सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी जिल्हा परिषद प्रशाला शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष माळगे, एस. टी. महामंडळाचे वाहक शिवशंकर कांबळे, सिद्राम सुतार, रामचंद्र सुतार, प्रेमनाथ कदम, महादेव भालेकर आदि मान्यवरांनी फेटा, शाल, पुष्पहार, पुष्पगुच्छ  श्रीफळ देऊन व पेढे भरवून सत्कार करून भावी करिअरसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

 
Top