धाराशिव / प्रतिनिधी-

महाराष्ट्र राज्याच्या क्रिकेट संघ निवडपूर्व आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेसाठी 19 वर्षाखालील मुली व 16 वर्षाखालील मुलांच्या जिल्हा संघ निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन 6 व 7 एप्रिल रोजी करंजकर हॉस्पिटलसमोरील शेरखाने प्लॉटिंगधमील क्रिकेट अकॅडमीच्या मैदानावर होणार आहे. या चाचणीत जास्तीत जास्त मुले, मुली खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन धाराशिव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.

 16 वर्षा खालील मुलांच्या निवड चाचणी करिता जन्मतारीख 01/09/2007 पुढे असावी, मुलांची निवड चाचणी दि. 06 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. तर 19 वर्षा खालील मुलींच्या संघासाठी निवड चाचणी करिता जन्मतारीख 01/09/2004 च्या पुढे असावी. मुलींची निवड चाचणी दि. 07 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. निवड चाचणीसाठी जन्मतारखेचा पुरावा व आधारकार्डची झेरॉक्स सोबत आणावी. स्पर्धेसाठी चाचणी शुल्क रु. पाचशे असून खेळांडूंनी क्रिकेट किट स्वतः आणायचे आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त क्रिकेट खेळाडू मुले व मुलींनी यात सहभाग घ्यावा, असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष विजय दंडनाईक व सचिव दत्ता बंडगर यांनी केले आहे. निवड चाचणीसंदर्भात अधिक माहितीसाठी दिनेश दत्ता बंडगर (7299227777), युवराज पवार (9921897965) रियाज शेख (9284538703) यांच्याशी संपर्क साधावा, असे असोसिएशनच्या वतीने कळविण्यात आले आहे.

 
Top