धाराशिव / प्रतिनिधी-

महात्मा बसवेश्वर जयंती महोत्सव समिती धाराशिव व शिवा अखिल भारतीय वीरशैव संघटनेच्या वतिने आयोजीत बसवेश्वर जयंती निमीत्त माजी मंत्री आ.राणाजगजितसिंहजी पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करुन   धाराशिव शहर व परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला यात युवा समाजसेवक  बाळकृष्ण साळुंके,दिपक नाईक,युवा उद्योजक निखील घोडके याच बरोबर नुकतेच पोलिस भरती मधे निवड झालेल विशाल साठे,रुतुजा साठे,पुजा जगदाळे,खोखो स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळवलेले निकीता पवार,गौरी शिंदे,रुतुजा खरे तसेच पोलिस भरतीसाठी विशेष परिश्रम घेनारे कमांडो अकॅडमी चे संचालक विशाल मार्तंदे,सोमनाथ मार्तंदे यांचा सन्मान करण्यात आला.

याचबरोबर बसवेश्वर जयंतीचे औचित्य साधुन धाराशिव शहरात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.या रक्तदान शिबीराला शहर व परिसरातुन रक्तदात्यांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर,प्र का स सतीश दंडनाईक ,महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीचे विठ्ठल खरे, मा नगरसेवक युवराज नळे , महात्मा बसवेश्वर जयंती अध्यक्ष श्रीराम मुंबरे ,अभिजित काकडे ,मल्लिनाथ सारने,सुरज सगरे,दीपक नाईक,नागेश निर्मले,धनंजय आढगळे,आकाश कानडे,गणेश राऊत,हरीश निर्मले,विनायक क्षिरसागर,अमित भेंडेगावे,योगेश बिसले,शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे महेश उपासे,समाधान भोरे,विनोद कानवले,नितीन लगदिवे सुनिल शेरखाने,संजय गिराम प्रफुल्ल शेटे,विनोद वाडकर,नितीन लगदिवे आदी पदाधिकारी समाज बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top