धाराशिव / प्रतिनिधी-

 भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या तर माता रमाई आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या शेजारील मोकळ्या जागेत २१ फुट अशोक स्तंभ व त्या स्तंभावरती रमाई आंबेडकर यांचे म्युरल साकारले जात आहे.

माता रमाई बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम वर्षभर राबविण्यात आले. तर त्यांची आठवण राहावी यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील उत्तरेकडील मोकळ्या मैदानात २१ फूट आकाराचा अशोक स्तंभ व त्या स्तंभावरती मध्यभागी ४ फूट आकाराचे माता रमाई यांचे म्युरल साकारण्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. यासाठी आ. कैलास पाटील यांनी त्यांच्या आमदार निधीतून १० लाख रुपयांची मदत केली आहे. तर ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी व निधीची मदत मिळविण्यासाठी रमाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक पृथ्वीराज चिलवंत यांनी प्रयत्न केले आहेत. ती मदत मिळाल्यामुळे अशोक स्तंभ उभारणीचे काम सुरू करण्यात आले असून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पूर्वी ते पूर्ण करण्यात येणार आहे. यामुळे शहराच्या वैभवात भर पडण्यास मदत होणार आहे.


 
Top