धाराशिव / प्रतिनिधी-

 पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी यांचे संकल्पनेतुन  उस्मानाबाद पोलीस दलातील पोलीस अधिकारी, अमंलदार व त्यांचे कुटुंबियाकरीता- आकाश दर्षन गृहताऱ्याच्या विश्वात या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस मुख्यालय येथे करण्यात आले. सदर कार्यक्मास नेहरु तारांगण, वरळी, मुंबई येथील मानद व्याख्याते श्री. एस. नटराजन यांनी उपस्थितीतांना अगदी सोप्या भाषेत खगोल शास्त्रा विषयी माहिती दिली. त्यामध्ये आकाशगंगेतील सर्वग्रहांची, व त्यांच्या उपग्रहाची सखोल माहिती दिली. त्यानंतर सायंकाळी पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर त्यांचे कडील दुर्बीणीव्दारे पोलीसांना व त्यांचे पाल्यांना,भोसले हायस्कुल, उध्दवराव पाटील प्रशाला  व शासकिय आदिवासी वसतिगृह येथील 100 ते 150 विद्यार्थी-विदयार्थींनी यांना आकाशातील गृह-तारे दाखवून त्याबाबत सखोल महिती दिली. तसेच मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांचे वाढदिवासा निमीत्त भोसले हायस्कुल, उध्दवराव पाटील प्रशाला  व शासकिय आदिवासी वसतिगृह येथील विद्यार्थी-विदयार्थींनी च्या हास्ते  पोलीस मुख्यालयात वृक्षारोपनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

 सदर कार्यक्रमा करीता   पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक  नवनीत कॉवत पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व शाखांमधील पोलीस अधिकारी, अंमलदार व त्यांचे कुटुंबीय, उस्मानाबाद येथील भोसले हायस्कुल, उध्दवराव पाटील प्रशाला  व शासकिय आदिवासी वसतिगृहातील 100 ते 150 विद्यार्थी-विदयार्थींनीसह शिक्षक उपस्थित होते.


 
Top