तुळजापूर / प्रतिनिधी-

 तुळजापूर हे श्री तुळजाभवानी तीर्थ संपूर्ण भारतातून येथे भाविक दररोज हजारोच्या संख्येने येत असतात त्यांच्या आरोग्य व्यवस्थेची जबाबदारी ही उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर यांच्या वरती असते, उपजिल्हा रुग्णालय हे भाविकांना सेवा देण्यासाठी जागे अभावी, डॉक्टर, कर्मचारी तसेच विविध यंत्रणा अभावी कमी पडत आहे, तरी आपण तुळजापूर तीर्थक्षेत्र व भाविकांचा विचार करून येथील उपजिल्हा रुग्णालयास जिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्यावा जेणेकरून जिल्हा रुग्णालयाच्या सर्व सुविधा मिळू शकतील, तसेच तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय येथे कायम स्वरूपी वैद्यकीय अधीक्षक नसल्याने रुग्णाची हेळसांड होत आहे, तरी तात्काळ कायमस्वरूपी वैद्यकीय अधीक्षक द्यावा ही विनंती, तसेच तुळजापूर शहर व नळदुर्ग शहर सर्व बाजूनी चार पदरी महामार्ग असलेले शहर आहेत, त्यामुळे वारंवार अपघात होत असतात यासाठी दोन्ही शहरांत ट्रोमा केअर सेंटर उभी करावी ही विनंती, या ट्रॉमा केअर सेंटर साठी तुळजापूर चे आमदार राणाजगजीतसिंह पाटील साहेब यांनी उपमुख्यमंत्री   देवेंद्र फडणवीस   यांच्या कडे मागणी केलेली आहे असे  निवेदणाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री मा ना श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना रुग्ण कल्याण समिती सदस्य आनंद कंदले यांनी केली.


 
Top