धाराशिव / प्रतिनिधी-

 राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत हे शेतकऱ्यांसाठी कैवारी ठरले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिव जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना भेट दिली त्या 2 शेतकऱ्यांना डॉ सावंत यांनी 12 लाख रुपयांची नुकसान भरपाई पोटी मदत केली. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी मदतीचा चेक शेतकरी यांच्याकडे सुपूर्द केला यावेळी अनिल खोचरे ,दत्ता मोहिते ,गौतम लटके,धनंजय पाटील उपस्थित होते.

 धाराशिव जिल्ह्यात वादळी वारे, गारपीट व अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे मोठे नुकसान केले, या अवकाळीचा फटका जिल्ह्यातील 71 गावांना बसला असुन पहिल्या दिवशी झालेल्या पंचनाम्यानुसार 2 हजार 571 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. तुळजापूर तालुक्यातील मोर्डा व धाराशिव तालुक्यातील वाडी बामणी येथे मुख्यमंत्री शिंदे यांनी भेट देऊन शेतकऱ्यांना आधार दिला त्यावेळी पालकमंत्री डॉ सावंत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर 2 शेतकऱ्यांना मदत करण्याचे जाहीर केले.

 मोर्डा या गावातील द्राक्ष बागायतदार सिताबाई सुरवसे यांची पूर्ण द्राक्ष बाग गारपीटने उदवस्त झाली होती त्यांना डॉ सावंत यांनी 10 लाख तर वाडी बामणी येथील टरबूज उत्पादक शेतकरी बाबासाहेब उबरदंड यांना 2 लाखाची मदत दिली.शेतकऱ्यांनी सावंत यांचे आभार मानले.


 
Top