धाराशिव / प्रतिनिधी-

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीच्या पूर्व संध्येला धाराशिव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या शेजारील मोकळ्या जागेत उभारण्यात आलेल्या २१ फुटी अशोक स्तंभ व त्यावरील माता रमाई आंबेडकर शिल्पाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील , माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्यासह अन्य मान्यवर आणि भीम सैनिकांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले. 

अशोकस्तंभ हे आपले राष्ट्रीय प्रतीक असून सामर्थ्य, एकता आणि शांततेचे प्रतिनिधित्व करतात तसेच अहिंसा, सहिष्णुता आणि सर्व जागतिक धर्मांचा आदर या मूल्यांचे समर्थन करतात.  रमाई फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी नगरसेवक पृथ्वीराज चिलवंत यांच्या संकल्पनेतून आणि आपल्या आमदार स्थानिक विकास निधीतून याची उभारणी करण्यात आली आहे. 

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार, माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर, शाम भैय्या जाधव, विशाल शिंगाडे, नितीन बागल, पंकज पाटील, बलराज रणदिवे, दिनेश बंडगर, कुणाल निंबाळकर, नाना घाडगे, राहुल गवळी, राजदीप गायकवाड यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक तसेच भीमसैनिक उपस्थित होते.


 
Top