नळदुर्ग / प्रतिनिधी-

 नळदुर्ग येथील डॉ. व्यंकटेश मुळे वय ६८ यांचे अल्पशा आजाराने दि.१४ एप्रिल रोजी रात्री १० वा. सोलापुर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असतांना निधन झाले. दि.१५ एप्रिल रोजी सकाळी ११ वा. अलियाबद येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

         डॉ. व्यंकटेश मुळे हे नळदुर्ग येथील पहिले एमबीबीएस डॉक्टर होते. त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण नळदुर्ग येथेच झाले होते. त्यांनी शासकीय वैद्यकीय अधिकारी म्हणुन अतीशय उत्कृष्ट काम केले होते. नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. ते धाराशिव येथे अतिरीक्त सिव्हिल सर्जन म्हणुन काम केले आहे.    दि.१४ एप्रिल रोजी अल्पशा आजाराने सोलापुर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या पाश्चात्य दोन भाऊ, पत्नी, मुलगा डॉ. विवेक मुळे,मुलगी सुन, नातु असा परिवार आहे.    दि.१५ एप्रिल रोजी येथील अलियाबद स्मशानभुमीत शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


 
Top