धाराशिव / प्रतिनिधी-

आज डॉ भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीचे औचित्य साधून घुगी गावामध्ये पाडोळी (आ )गटाच्या माजी जिल्हा परिषद सदस्या कू.सक्षणाताई सलगर यांच्या हस्ते घुगी (एकनाथवाडी) येथे सर्व प्रथम भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वज रोहण करण्यात आले.

तसेच नवीन वास्तू समाजमंदिराचे लोकार्पण केले,तसेच गावातील ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहावे या उद्देशाने आर ओ प्लांट चे लोकार्पण सोहळा संपन्न झाला तसेच मूळ गाव घुगी मध्ये मुस्लिम बांधवांसाठी कब्रिस्तान साठी संरक्षकभिंतीचे तसेच दर्गा परिसरामध्ये पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठीभूमिपूजन करण्यात आले तसेच गावातील मुख्यचौकामध्ये आ.एकनाथ खडसे यांच्या निधीतून पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी भूमिपूजन करण्यात आले एकंदरीत 14लक्ष निधीचे लोकार्पण व 25लक्ष निधीचे भूमिपूजन सक्षणाताई सलगर यांच्या हस्ते करण्यात  आले या प्रसंगी मार्गदर्शन करत असताना त्यांनी घुगी हे गाव महाराष्ट्र मध्ये एक आदर्श व मॉडेल गाव  बनवूत असे वचन दिले त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असे ही त्यानी सांगितले.

या कार्यक्रमासाठी गावच्या प्रथम नागरिक सौ.शुभांगी गोविंद पवार (सरपंच), प्रिती बेहेरे(ग्रामसेवक),माजी सरपंच बळीराम सगर, माजी पंचायत समिती सदस्य नागनाथ अप्पा पवार माजी उपसरपंच सतीश जावळे, ग्रामपंचायत सदस्य शरद चव्हाण ,नवनाथ बनकर, दत्ता जावळे , भरत जावळे तंटामुक्ती अध्यक्ष बाळकृष्ण जावळे पिरपाशा शेख,राकेश जटाले,राजेंद्र जावळे, बबन जावळे, समाधान गवाड,बाळू क्षिरसागर, इलाही शेख, मधुकर वाघमारे,नितीन चव्हाण, विशाल साबळे,प्रशांत गरड,सुरेश चव्हाण,सतीश वाघमारे, गोविंद चव्हाण,आदी मान्यवर उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद पवार यांनी केले शेवटी आभार मानून कार्यक्रम संपला असे जाहीर केले.

 
Top