उमरगा / प्रतिनिधी-

 विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त शुक्रवारी ( दि.१४) सकाळपासून पालिकेसमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विविध पक्ष, संघटना आणि आंबेडकर प्रेमींनी पुष्पहार घालून अभिवादन केले.

प्रारंभी शेलवंतीताई गायकवाड यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे तर, माजी नगरसेविका ललिता सरपे यांच्या हस्ते निळ्या ध्वजाचा ध्वजारोहण करण्यात आले. धम्मचारी प्रज्ञाजित, धम्मचारी विबोध, धम्ममित्र जी. एल. कांबळे, शाक्यदिप कांबळे यांनी सामुदायिक बुध्द वंदना घेतली. उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते, उपविभागीय अधिकारी गणेश पवार, लोहाऱ्याच्या गटविकास अधिकारी शितल शिंदे, तहसीलदार गोविंद येरमे, पोलिस निरीक्षक मनोजकुमार राठोड, नायब तहसीलदार शिवाजी कदम, पालिकेचे कार्यालयीन अधिक्षक तुळशीदास वराडे, श्रीधर सरपे, राहूल सरपे, अजय सरपे, सहदेव सोनकांबळे, कमलाकर सूर्यवंशी, शाक्यदिप कांबळे, गोळाप्पा कांबळे यांच्या हस्ते पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, भाजपाचे तालुकाध्यक्ष कैलास शिंदे, प्रदेश कॉंग्रेस सचिव दिलीप भालेराव, कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, नो चँलेज ग्रुपचे अध्यक्ष विजय वाघमारे, माजी नगरसेवक विक्रम मस्के, सतिश सुरवसे, चंद्रशेखर पवार, प्रा. डॉ. शौकत पटेल, युवा नेते किरण गायकवाड, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे,  जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती दिग्विजय शिंदे, हरीष डावरे, माजी नगराध्यक्ष पोपटराव सोनकांबळे, अभिमन्यू भोसले, सुशिल दळगडे, दत्ता रोंगे, मराठा सेवा संघाचे अनिल सगर, भूमिपुत्र वाघ, प्रा. किरण सगर, दिगंबर भालेराव, धीरज बेळंबकर, बाबा मस्के, मिलींद डोईबळे, वंचित बहुजन आघाडीचे राम गायकवाड, विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष अँड. जी. के. गायकवाड, अँड. मल्हारी बनसोडे, अँड. हिराजी पांढरे, सुभाष काळे आदींनी डॉ. बाबासाहेबाच्या पुतळ्याला अभिवादन केले. 

------

विविध संघटनांच्या वतीने जयंती साजरी

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भिम जयंती साजरी झाली. पोलिस निरीक्षक मनोजकुमार राठोड, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश क्षिरसागर, जिल्हा उपाध्यक्ष सचिन माने, तालुकाध्यक्ष कृष्णा जमादार, शहराध्यक्ष हरिभाऊ सुरवसे आदी उपस्थित होते. राज प्रतिष्ठानच्यावतीने अध्यक्ष दिपक झाकडे, सनी सोनकांबळे, राहील शेख, मर्चंड बागवान आदींनी भिम जयंती साजरी केली. सारनाथ बौध्द विहार, समता नगर, एकता नगर, भिमराष्ट्र ग्रूप, बसस्थानक ॲटो यूनियन, काळे प्लॉट, कास्ट्राईब कर्मचारी संघटना, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, आदर्श महाविद्यालयासह  शाळा व ग्रामपंचायतीत भिम जयंती साजरी करण्यात आली. दरम्यान दिग्विजय गॅस एजन्सीचे प्रमुख कैलास शिंदे यांनी गेल्या दहा वर्षापासुन जयंतीदिनी आलेल्या  भीमबांधवांना जेवण व पाण्याची सोय करण्याची परंपरा कायम ठेवली होती. 


 
Top