तुळजापूर/ प्रतिनिधी-

येथील   बंद एस एस मोबाईल शॉपीचे शटर  सोमवार दि२०रोजी पहाटे उचकावुन अज्ञात चोरट्यांनी उघडून मध्ये प्रवेश करुन  119 मोबाईल फोन व ॲसेसरीज सामान असा एकुण 30,31,381 रुपयाचा चा माल चोरुन नेल्या प्रकरणी पोनि अजिनाथ काशीद यांच्या मार्गदर्शन खाली नऊ दिवस त्याचा मागोवा घेवुन अखेर मालेगाव येथील मिनी पाकीस्तान  येथुन एकास पोलिसांनी  ताब्यात घेतले.

यासाठी  नऊ दिवस  तुळजापूर पोलिस याचा मागावर होते. सदरील इसम  मालेगाव मधील मिनी पाकीस्तान   म्हणून परिचित असलेल्या ऐका घरातुन पोलिसांनी चतुराईने ताब्यात  घेतला. त्यास शनिवारी सकाळ तुळजापूर ला आणुन  त्यास तुळजापूर  न्यायालया समोर उभे केले असता त्यास न्यायमुर्तीनी पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

सदरील आरोपी शातीर  असुन तो दहा जिल्हयातील पोलिसांच्या लिस्ट वरील वाँटेड आरोपी असल्याचे समजते

 याने हैद्राबाद येथील सर्वात मोठी मोबाईल शाँपी फोडली होती हैद्राबाद बरोबरच मुंबई  परभणी लातूर अकोला  सह मोठमोठ्या शहरातील सर्वात मोठी मोबाईल शाँपी तो फोडत असे माञ तो एकाही प्रकरणात सापडला नव्हता माञ तुळजापूर पोलिस स्टेशनचे पोनि अजिनाथ काशीद यांनी शांत डोक्याने तपास सुरु केला त्यात त्यांनी 

 तुळजापूर पोलिस स्टेशनचे पथक त्याचा मागावर  पाठवले.   तुळजापूर पोलिस स्टेशन चे पो उपनि कांबळे हे नऊ दिवस  मिनी पाकीस्तान मध्ये लोकेशन माध्यमातून त्याचा मागावर होते अखेर  माहीती मिळतीच  ही माहीती मालेगाव पोलिस ठाण्यास दिली असता मालेगाव पोलिसांनी घराला वेडा मारला असता तो घरात होता  नंतर त्यास बाहेर येण्यास  पोलिसांनी विनंती केली असता त्याने डोके जमिनीवर आपटुन घेतले व डोक्याला जखमी झाली  अखेर पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले  व तुळजापूरला आणले 

पाच दिवासाची पोलिस कोठडी मिळाल्याने आता मुद्देमाल कुठे ठेवला कि विकला हे तपासात कळुन येणार आहे.


 
Top