धाराशिव / प्रतिनिधी-

देशात खास पत्रकारांच्या विविध समस्यावर काम करणाऱ्या फाइल्स ऑफ मीडिया या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या साप्ताहिक विंगच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी पांडुरंग मते यांची निवड करण्यात आली आहे.

ही निवड व्हॉइस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगचे प्रदेशाध्यक्ष विनोद बोरे यांनी एका पत्राद्वारे केली आहे. दिलेल्या पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की, पत्रकारांच्या व पत्रकारितेच्या सर्वांगीण विकासासाठी आपण काम करणार आहात. मूल्याधारित पत्रकारिता ही विचारधारा कायम रहावी. ज्या पत्रकारितेच्या जीवावर या सृष्टीचा डोलारा चालतो, ती पत्रकारिता शाबूत व सुरक्षित राहावी. यासाठी आपण काम करणार आहोत आपल्यावर दिलेली जबाबदारी आपण पार पाडाल अशी अपेक्षा व्यक्त करीत पुढील कामास गती द्यावी. तसेच मते यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत. या निवडीबद्दल 

राज्य उपाध्यक्ष संजय मालाणी, मराठवाडा अध्यक्ष विजय चोरडिया, बीड जिल्हाध्यक्ष जालिंदर धांडे, उपाध्यक्ष अमोल जाधव, परभणीचे महेश देशमुख धाराशिवचे जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी डिजिटल मीडिया विंगचे जिल्हाध्यक्ष वैभव पारवे, जिल्हा कार्याध्यक्ष रहीम शेख, महानगराध्यक्ष मल्लिकार्जुन सोनवणे, तालुकाध्यक्ष अमजद सय्यद, अरुण गंगावणे, सलीम पठाण, जफर शेख, कुंदन शिंदे, राहुल कोरे, सतीश मातने आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. या निवडीबद्दल मते यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 
Top