धाराशिव / प्रतिनिधी-

 धाराशिव जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेच्या वतीने धाराशिव येथील तुळजाभवानी स्टेडियम मध्ये अॅथलेटिक्स उन्हाळी (मैदानी)क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

11 एप्रिल पासून प्रारंभ होणारे हे शिबिर 15 मे पर्यंत घेण्यात येणार आहे. 4 ते 18 वर्ष वयोगटातील मुले व मुलींसाठी शिबिर असणार असून तज्ञ मार्गदर्शका मार्फत तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येणार आहे.तसेच या शिबिरात खेळा बरोबरच आहारतज्ज्ञ, फिजिओथेरपीस्ट, मानसोपचारतज्ज्ञ,योगा यांचेही खेळाडूंना मार्गदर्शन मिळणार आहे तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथे प्रशिक्षण सकाळी 6.00 ते 8.00 व सायंकाळी 5.00 ते 7.00 या वेळेत देण्यात येणार आहे. शिबिर पूर्ण केल्यानंतर सर्व सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. शिबिरात प्रवेशासाठी आणि अधिक माहितीसाठी जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे सचिव तथा मुख्य प्रशिक्षक योगेश  थोरबोले(9860609056),प्रशिक्षक माऊली भुतेकर(9404193674)सहाय्यक प्रशिक्षक सुरज ढेरे(8605511878) यांच्याशी संपर्क साधून जास्तीत जास्त मुला मुलींनी शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.


 
Top