धाराशिव / प्रतिनिधी-

 भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कुठलाही वायफळ खर्च करीत नाहीत. त्याऐवजी होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तर कुष्ठधाममधील रुग्णांना आवश्यक ती मदत व इतर सामाजिक उपक्रम राबवून जनजागृती करण्याचे काम विजय मस्के सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात येत असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विजय मस्के यांनी दिली.

उस्मानाबाद शहरातील इंदिरा नगर भागातील विजय मस्के सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने कुष्ठधाम येथील रुग्णांना अन्नदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना  म्हणाले की, या प्रतिष्ठानच्या  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसाठी डॉल्बी, डीजे व मिरवणूक आधीसाठी होणारा वायफळ खर्च टाळून निराधारांना कपडे, जेवण, कुष्ठधाममधील रुग्णांना आवश्यक असलेली औषधे तसेच होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून त्यांना आवश्यकतेनुसार इतर साहित्य देखील पुरविण्याचे काम या प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्याने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश पवार, उपाध्यक्ष लक्ष्मण शिंदे, सचिव बजरंग पवार सुनील क्षीरसागर, रामलिंग वाघमारे, रविराज मस्के, बालाजी पवळे, पृथ्वीराज मस्के, गुरुराज शिराळ, प्रा. किरण लोमटे, मारुती सावंत, सुरज भिसे, गायकवाड आदी उपस्थित होते.

 
Top