धाराशिव / प्रतिनिधी-

कळंब तालुक्यातील येरमाळा येथील दाेन किराणा दुकानांवर सहाय्यक पाेलीस अधिक्षकांच्या पथकाने २४ एप्रिल राेजी अचानक छापा मारला. या कारवाईत सुमारे पावणेनऊ लाखांचा गुटखा, सुगंधित तंबाखू पानम साला जप्त करण्यात आला आहे.

 येरमाळा येथील चक्क किराणा दुकानात प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू पान मसाला माेठ्या प्रमाणात असल्याची माहिती सहाय्यक पाेलीस अधिक्षक एम. रमेश यांच्या पथकाला मिळाली. यानंतर त्यांच्या नेतृत्वातील पथकाने यागुप्त माहितीच्या आधारे २४ एप्रिल राेजी येरमाळा येथील बाबा कलेक्शनच्या बाजुला असलेल्या किरणा दुकानावर छापा टाकला. येथून सुमारे १ लाख २१ हजार ८९७ रूपये किंमती प्रतिबंधित गुटखा सुगंधित तंबाखू पान मसाला जप्त केला. यानंतर संबंधित पथकाने येडेश्वरी किरणा दुकान, राहते घर आणि गाेडाऊनावर छापा टाकला.

या कारवाईत तब्बल ७ लाख ६१ हजार ८७४ रूपये किंमतीचा गुटखा सुगंधित तंबाखू पान मसाला जप्त करण्यात आला. या प्रकरणी आराेपी नामदेव पारवे, दत्तात्रय नारायण रणिसंगे या दाेघांविरूद्ध येरमाळा पाेलीस ठाण्यात वेगवेगळे दाेन गुन्हे दाखल करण्यात आले. पथकामध्ये सपाेनि पाटील, पाेउपनि पुजरवाड, नाईकवाडे, पाेलीस अंमलदार नवनाथ खांडेकर, किरण अंभाेरे, अमाेल राऊत आदींचा समावेश हाेता.

 
Top