धाराशिव / प्रतिनिधी- 

धाराशिव  जिल्ह्यातील तेर गावचे जावई असलेले विरोधी पक्षनेते अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी सासरवाडीमध्ये `भावी मुख्यमंत्री` असे फलक लावण्यात आले आहेत.  येथील राष्ट्रवादीचे युवानेते पृथ्वीराज आंधळे यानी हे बॅनर लावले असून संत गोरोबा काकांच्या मंदीरात दुग्धाभिषेक करुन अजित पवार मुख्यमंत्री व्हावे यासाठी साकडे देखील घातले आहे.

त्यामुळे पुन्हा अजित पवारांच्या  मुख्यमंत्री पदाची चर्चा सूरु झाली आहे. त्यातच आजपासुन तीन दिवस मुख्यमंत्री रजेवर गेल्याची चर्चा देखील राज्यभरात होतांना दिसते आहे.  जिल्ह्यातील तेर गावच्या पाटील घराण्यातील कन्या सुनेत्रा यांच्याशी अजित पवार यांचा विवाह झाला असुन ते तेरचे म्हणजे जिल्ह्याचे जावई आहेत.


 
Top