धाराशिव / प्रतिनिधी-

डॉ.पदमसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन   पाडोळी, ता.कळंब  येथे  करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात अणदूर व परिसरातील सर्व वयोगटातील ६००  महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.

 कार्यक्रमाचे उद्घाटन  जेष्ठ विश्वस्त श्री आशोक भाऊ शिंदे, यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे, मा. सभापती दत्ता साळुंके, सरपंच गोविंद टेकाळे, चेअरमन साहेबराव सरवदे नायगावची सरपंच राजभाऊ पाटील, विकास टेकाळे, लक्ष्मण टेकाळे, बाळासाहेब सरवदे, दिलीप सरवदे, मचिद्र खडके, दत्ता टेकाळे, पंडीत लाला टेकाळे, विशाल पाटील, गोंवीद टेकाळे,  .इत्यादी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.‍ अजित निळे, डॉ.विश्वजीत कदम, डॉ. क्लिंटन डिसील्वा, डॉ.ऐश्वर्या, डॉ.दिपक नायर, डॉ.अजय राघवन यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे विनोद ओव्हळ,  पवन वाघमारे,  निशिकांत लोकरे, नामदेव शेळके, व पाडोळी उपकेंद्राचे डॉ. सुप्रीया सरवदे, डॉ. लोहार व  आशा कार्यकर्ता छाया तुंदारे, भाग्यश्री कसपटे यांनी परीश्रम घेतले.


 
Top