धाराशिव / प्रतिनिधी-

 भारतीय जनता पार्टी व शिवसेने च्या माध्यमातून मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे   व उपमुख्यमंत्री  . देवेंद्र फडणवीस  यांनी राज्यात “स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा” सुरू केली आहे. या माध्यमातुन स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशासाठी केलेले कार्य जनतेपर्यंत पोहोचवले जात आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत,  आ.राणाजगजितसिंह पाटील व मा.आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे व शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव येथे दिनांक ०६ एप्रिल रोजी सायंकाळी ०५ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

 सदरील यात्रा आर्य समाज ते अंबाला हॉटेल, काळा मारुती चौक, ताजमहल टॉकीज, ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गाने होणार असुन, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे यात्रेचा समारोप होणार आहे.

 तरी सावरकर प्रेमींनी मोठ्या संख्येने “स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रे ” मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन यात्रा संयोजक तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री. युवराज नळे, शिवसेनेचे श्री.‍अनिल खोचरे व सहसंयोजक तथा भाजपा शहराध्यक्ष राहुल काकडे यांनी केले आहे.


 
Top