धाराशिव   / प्रतिनिधी-

 केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सोलापूर येथील केंद्रीय संचार ब्यूरोच्या वतीने दिनांक २२ एप्रिल २०२३ रोजी सांयकाळी ०७:००  वाजता ग्रामपंचायतच्या प्रांगणात ,कावळेवाडी ता व जि उस्मानाबाद येथे जागतिक वसुंधरा दिनानिमित्त विशेष लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

  वाढते प्रदूषण, स्वच्छतेचा अभाव माठ्या प्रमाणावर जंगलांचा –हास, वन्यजीवांची शिकार,नद्यांचे प्रदूषण,शेतीत रासायनिक खतांचा व किटकनाशकांचा अमर्याद वापर आणि अयोग्य जीवणशैली यामुळे पृथ्वीला हानी पोहचत आहे. या सर्व मानवनिर्मित आपत्ती पासून पृथ्वीचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी जगभरात सर्वत्र दिनांक २२ एप्रिल रोजी जागतिक वसुंधरा दिनांचे आयोजन केले जाते. या दिनानिमित्त नागरिक व विद्यार्थींमध्ये  जागृती निर्माण करण्यासाठी उपरोक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 या कार्यक्रमानिमित्त कावळेवाडी गावातील ग्रामस्थांसाठी पर्यावरणावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अटल भूजल योजना आणि पृथ्वीचे संवर्धन या विषयावर वरिष्ठ भूवैज्ञानिक शास्त्रज्ञ डॉ एस बी गायकवाड मार्गदर्शन करणार आहेत.  यावेळी लातूर येथील मुक्ताई कला बहुदेशीय संस्थेच्या कलाकाराकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. कार्यक्रमातील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन सत्कार करण्यात येणार आहे.

   या कार्यक्रमासाठी सरपंच अजित खोत, जिल्हा ग्रामीण विकास संस्था उस्मानाबादचे प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा,उस्मानाबाद पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संतोष नलावडे, क्षेत्रीय प्रचार सहायक अंबादास यादव, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, पंचायत अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ खोत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


 
Top