परंडा / प्रतिनिधी -

परंडा येथील राज कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा तसेच मंथन स्पर्धा परीक्षेतील यशाबद्दल मार्गदर्शक व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. 

यामध्ये कु.राधेय उदय काळे या विद्यार्थ्याची  केंद्र सरकार आयोजित सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत एस.के इंटरनॅशनल सैनिक स्कूल सांगली येथे निवड झाल्याबद्दल व कु.श्रेणिक सिताराम पौळ या विद्यार्थ्याने स्कॉलर सर्च मिशन अंतर्गत गट शिक्षण कार्यालय परंडा आयोजित पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी तालुकास्तर शिष्यवृत्ती सराव परीक्षा 2023 

यामध्ये 238 गुण घेऊन परंडा तालुका ग्रामीण विभागातून प्रथम तसेच मंथन स्पर्धा परीक्षेत 228 गुण घेऊन परंडा तालुक्यात प्रथम या यशाबद्दल राज कोचिंग क्लासेस परंडा येथे सत्कार करण्यात आला. यावेळी पालकांच्या वतीने मार्गदर्शक सुजित देशमुख यांचाही सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक अशोक वडतिले,उदय काळे,  युवराज साबळे, सिताराम पौळ,शहानवाज सय्यद आदी पालक उपस्थित होते.


 
Top