उमरगा/ प्रतिनिधी-

 उमरगा शहराचे ग्रामदैवत महादेव मंदिराच्या यात्रेनिमित्त मंगळवारी ( दि. ४)  आयोजित कुस्त्यांच्या फडात कर्नाटकासह लातूर, सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील येथील मल्लांनी विविध डावपेच आखून कुस्त्यांचा आखाडा लक्षवेधी केला. दरम्यान पंढरपुरच्या मोनेश गावडे याने मानेवाडी (ता. तुळजापूर) येथील राघव बरवे या दोन्ही मल्लांत झालेल्या शेवटच्या कुस्तीत मोठ्या कौशल्याने चिवट खेळ सुरू होता. अखेर मोनिश ने डावपेचाची चाल यशस्वी करत राघवला चितपट केले. 

ग्रामदैवत श्री. महादेव मंदिराच्या यात्रेनिमित्त झालेल्या कुस्त्यांच्या आखाड्यात लहान, मोठ्या गटातील मल्लांनी विविध डाव साधत कौशल्य दाखवून कुस्त्या गाजवल्या. महादेव पंच समितीने आयोजित केलेल्या कुस्त्यांच्या फडात जवळपास दोनशेहुन अधिक मल्लांनी सहभागी घेतला. कुस्त्यासाठी एकुण ७५ हजाराचे बक्षिस मल्लांना देण्यात आले. अरूण साळूंके (कोतनहिप्परगा), लहु गोरे, बालाजी पेद्दे, आकाश गड्डे (रामलिंगमुदगड), अक्षय नरवटे, बाबु मुळजे (कुन्हाळी),  राम कठारे, विद्यासागर फुलसुंदर (उमरगा), अप्पू भुसणे (भुसणी), अशोक पवार (वडगाव), शेखर मारेकर (माडज) या मैलांनी  स्वतःचे कौशल्य दाखवत कुस्त्या जिंकल्या. माजी नगरसेवक राजेंद्र सूरवसे यांनी आईच्या स्मरणार्थ शेवटच्या कुस्तीसाठीचे  पाच हजाराचे बक्षीस दिले. दरम्यान उमरग्याचा मल्ल अमर मसरे यांनी धनु गाडे चितली (ता.आळंद) याला चित करून कुस्ती जिंकली. शिवाजी वराडे, उमराव बनसोडे, अमोल मिरकले, राम कठारे, अरूण साळूंके यांनी पंच म्हणून काम पाहिले. महादेव पंच कमिटीचे अध्यक्ष सखाराम भातागळे, बाबूराव सुरवसे, करबस शिरगुरे, बळीराम कोराळे, राम पौळ, भरत भोसले, चंद्रकांत मजगे, राजीव दामशेट्टी, गिरीश सुर्यवंशी, दिलीप इंगळे, अशोक मिरकले, किशोर शिंदे, कैलास शिंदे, राहुल शिंदे, दिनेश शिंदे, राम माळी, नितीन सुर्यवंशी, सचिन शिंदे, गुलाब शिंदे आदींनी यासाठी पुढाकार घेतला. 

-----

 
Top